Whatsapp University

सोडून द्यावं

↪ Forwarded many times 1 min read

एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल
तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं

ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील
तर उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं

मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील
तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं

एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली
तर मनावर घेणं सोडून द्यावं

आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर
इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं

ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं
तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं

प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं
म्हणूनच म्हणते तुलना करणं सोडून द्यावं

आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर
रोज जमाखर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top