एकदा एके ठिकाणी एका २५ मजली इमारतींच्या मध्ये एक तार बांधली होती. त्या तारेवरून एक डोंबारी हातात बांबू व खांद्यावर त्याचे मुल घेऊन चालत होता. हजारो लोक श्वास रोखून पाहत होते. तो डोंबाऱ्याने अगदी विश्वासाने, आपल्या मुलाचे आयुष्य पणाला लावत त्या ते अंतर लीलया पार केले. तो गर्दीला उद्देशून म्हणाला की “तुम्हाला असे वाटते का की हे जे मी अत्ता केले ते परत करू शकेन का?” गर्दी जोरात ओरडली “हो नक्कीच तू हे परत करू शकशील” त्याने परत विचारले “तुम्हाला नक्की वाटते की मी हे करू शकेन?” परत गर्दीतून आवाज आले “हो नक्की कितीही वेळा करू शकशील”
डोंबारी म्हणाला “ठीक आहे, कुणीतरी आपल्या मुलाला घेऊन या पुढे, मी त्या मुलाला खांद्यावर घेऊन चालणार आहे.”
संपूर्ण गर्दी गप्प झाली, शांतता पसरली
डोंबारी म्हणाला “काय झाले घाबरलात…? अत्ता तर तुम्ही ओरडत होतात मी हे करू शकेन. खरे सांगायचे तर तुमची आस्था होती की मी हे करू शकेन पण तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता. दोन्ही मध्ये खूप फरक आहे”
मित्रांनो मला हेच सांगायचे आहे देव,गणपती आहे… ही आपली आस्था आहे पण आपला देवावर संपूर्ण विश्वास आहे का?
You Believe in God but you don’t Trust him.
आणि जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर मग कोरोना ची भीती , चिंता, राग, द्वेष आणि तणाव का आहे…
डॉ. प्रशांत पुरंदरे,नाशिक