HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Life

रुस मधील विवाह

by whatsapp जनता
in Life, Patriotism, Story
395 4
कोरोनाकालीन लग्न
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

💐सुधा नारायण मूर्ती आपला अनुभव सांगताना लिहितात :💐

“नुकतीच मी रशिया मधील माॅस्को येथे गेले होते. तेथे एक दिवस मी बागेत गेले. त्या दिवशी रविवार होता.
उन्हाळ्याचा महिना होता, पण हवामान थंड होते व थोडा रिमझीम पाऊस पडत होता. मी छत्रीखाली उभी राहून तेथील परिसराच्या सुंदरतेचा आनंद घेत होते. तेव्हा अचानक माझी दृष्टी एका तरूण जोडप्यावर पडली.

RelatedPosts

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

आज की औरतें

मला स्पष्टपणे दिसत होते, की त्यांचे नुकतेच लग्न झालेले होते. ती तरुणी वीस वर्षाची वाटत होती. दाट केस, निळे डोळे व सडपातळ बांध्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत होती.

तरुणही तिच्याच वयाचा दिसत होता.आणि सुंदर अशा लष्करी गणवेषात होता.

त्या तरुणीने पांढऱ्या रंगाचा सुंदर सॅटिनचा वेडींग गाऊन घातला होता. जो मोत्यांनी आणि सुंदर अशा लेसने सजवलेला होता. तिच्या मागे दोन तरुण करवल्या उभ्या होत्या, ज्यांनी वेडींग गाऊन खराब होऊ नये म्हणून, त्याचे काठ उचलून धरले होते.

त्या युवकाने भिजू नये म्हणून आपल्या डोक्यावर छत्री धरली होती आणि ती तरुणी एक पुष्पगुच्छ घेऊन उभी होती. दोघेही आपले हात जोडून उभे होते.

ते दृश्य खूपच सुंदर होते.

त्यांना बघून मला खूप आश्चर्य वाटले आणि मी विचार करू लागले की लग्नानंतर लगेचच ते अशा पावसात, या बागेत का आले आहेत ? जर त्यांना हवे असते तर ते दुसर्‍या कुठल्या चांगल्या ठिकाणीही जाऊ शकले असते. मी त्यांना स्मारकाजवळ असलेल्या चौथऱ्यावर एकत्र चालत येताना बघितले. त्यांनी तो पुष्पगुच्छ तिथे ठेवला, शांतपणे स्तब्ध उभे राहून आपले मस्तक झुकवले आणि सावकाशपणे परत निघून गेले.

बराच वेळ मी ह्या दृश्याचा आनंद घेत होते. पण मला जाणून घेण्याची उत्सुकता होती की हे काय चालले होते?

माझी नजर एका वृद्ध गृहस्थाकडे गेली जो त्या नवविवाहित जोडप्याबरोबर उभा होता. त्या वृद्ध माणसाची नजर माझ्या साडीकडे जाताच त्यांनी विचारले, “आपण भारतीय आहात का?” मी प्रेमाने उत्तर दिले, “होय, मी भारतीय आहे.” अशा तर्‍हेने आमच्यामध्ये आपुलकीचे संभाषण सुरू झाले. त्या दरम्यान, मी मला पडलेला एक प्रश्न विचारण्याची वाट बघत होते. आणि म्हणून कुतूहलाने मी त्यांना विचारले की त्यांना इंग्रजी कसे काय येते?

अतिशय नम्रपणे त्यांनी उत्तर दिले, “मी परदेशात काम केले आहे.” लगेच मी विचारले, “कृपया आपण मला हे सांगाल का की हे तरूण जोडपे आपल्या लग्नाच्या दिवशी या युद्ध स्मारकावर का आले आहे?”

त्यांनी सांगितले, “ही रशियातील परंपरा आहे आणि येथे विवाह नेहमी शनिवारी किंवा रविवारीच होतात.” ते पुढे म्हणाले, “येथे प्रत्येक नवविवाहित जोडप्यांना कार्यालयामध्ये जाऊन रजिस्टरवर हस्ताक्षर केल्यानंतर, हवामानाची पर्वा न करता जवळच्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्मारकांना भेट द्यावी लागते. या देशातील प्रत्येक तरुणाला कमीत कमी दोन वर्षे तरी सैन्यात नोकरी करावीच लागते. आणि तो कोणीही असो, त्याला त्याच्या लग्नात त्याचा लष्करी गणवेषच घालावा लागतो.”

हे ऐकून आश्चर्याने मी विचारले, “येथे अशी प्रथा का आहे?”

हे ऐकून ते म्हणाले की, “हे एक कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आमच्या पूर्वजांनी रशियाने लढलेल्या अनेक लढायांमधे आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. त्यातील काही युद्धे आम्ही जिंकलो, काही हरलो. पण त्यांचे बलिदान हे नेहमी देशासाठीचे होते. म्हणूनच, प्रत्येक नवविवाहित जोडप्यांनी ही आठवण ठेवली पाहिजे की आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळेच ते शांतीपूर्ण आणि स्वतंत्र अशा रशियामध्ये राहात आहेत. आणि यासाठीच त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत.”

“🙏🏻आम्ही वयस्क हे मानतो की देशप्रेम हे कुठल्याही लग्नकार्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही ही परंपरा चालू ठेवण्यावर जोर देतो. मग ते मास्को असो, सेंट पीटर्सबर्ग असो किंवा रशियाच्या कोणत्याही अन्य भागात असो. म्हणूनच लग्नाच्या दिवशी त्यांना जवळ असलेल्या युद्ध स्मारकाला भेट द्यावीच लागते.”🙏🏻

त्या वृद्ध व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणानंतर माझ्या मनात सारखा सारखा एकच विचार येत होता, की आपण आपल्या इथे आपल्या मुलांना काय शिकवतो? आपल्याकडे असा शिष्टाचार आहे का, की आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशी आपण आपल्या शहीदांचे स्मरण करावे?

आपल्याकडे लग्नसमारंभाच्या वेळी आपण साड्या व दागदागिने खरेदी करण्यात, लग्नाच्या दिवशीचे जेवणाचे पदार्थ ठरवण्यात व डिस्कोमध्ये पार्टी करण्यात मग्न असतो.

आपण कधीही ह्या गोष्टीचा विचारही करत नाही.

हे सर्व बघून माझे डोळे अश्रूंनी भरून आले. मला वाटू लागले की आपणही रशियन लोकांकडून या उदात्त कल्पनेचा आणि परंपरेचा धडा शिकायला हवा.

🌹आपणही आपल्या शहिदांचा सन्मान करायला हवा, ज्यांनी आपल्या देशासाठी आणि आमच्या आजच्या व उद्याच्या भविष्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे…!🌹

Related Posts

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

by whatsapp जनता
May 8, 2025
0

१९९० पूर्वी…लग्नामध्ये आहेर/ भेटवस्तु केल्यानंतर माईकवरून सांगण्याची पद्धत होती.अमुक अमुक व्यक्ती कडून एक रुपया, तमूक तमूक कडून दोन रुपये, अशा प्रकारे!ज्याची भेट...

Read more
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

by whatsapp जनता
May 8, 2025
0

कुंभाराला म्हणाले "मडकं दे". तो पटकन xxx कडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका". खरं तर xxx लाही माहित नव्हतं...

Read more
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

by whatsapp जनता
March 18, 2025
0

आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...

Read more
भगवंताचं ATM
Life

आजची सावित्री डॉ. सौ.रीना कैलास राठी

by whatsapp जनता
February 29, 2024
0

शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र ! नाशिक...

Read more
भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणस..!!!
Motivational

शिक्षक !

by whatsapp जनता
February 29, 2024
0

🔥कर्तव्य🔥 बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. "अरे...

Read more
समय के साथ चलो
Articles

घड्याळ परिवार

by whatsapp जनता
February 29, 2024
0

घड्याळ ...... जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

3 weeks ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

3 weeks ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

3 weeks ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.