HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

by whatsapp जनता
in History, Life, People, philosophy, मराठी
396 4
१२०० रागांचा अफाट खजिना
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

१९९० पूर्वी…
लग्नामध्ये आहेर/ भेटवस्तु केल्यानंतर माईकवरून सांगण्याची पद्धत होती.
अमुक अमुक व्यक्ती कडून एक रुपया, तमूक तमूक कडून दोन रुपये, अशा प्रकारे!
ज्याची भेट अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं!
त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल अशा दिमाखात दाखवत, गावात पूर्ण फेरफटका मारायचा, त्यावेळेस त्याची शान काही औरच होती.
आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की!

लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण किंवा लापशी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेतांना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिनपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झाले.

RelatedPosts

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

रुस मधील विवाह

आज की औरतें

लग्नाआधी मुला-मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावयाची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला मळवट, त्यावरून लावलेली चमकी; सगळे नव्या पीढीला पटणार देखील नाही….
कालाय तस्मै नमः..

“आली ईईईईई लग्नघटी….
समीप नवरा” …
अशी आरोळी कानावर पडली की बूड झटकायला सुरुवात करायची.
नंतर ‘वाजवा रे वाजवा’ ….
असे बामन म्हणला, की मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे …
जेणेकरून
“तदेव लग्नम सुजनम तदेव..
ताराबलम चंद्रबलम”
ऐकायच्या आत मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरानवरीच्या अंगावर बचकन फेकून पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे ….
पहिली पंगत !

गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल, त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही.
तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारे पर्यन्त पत्रावळी वाला पंगतीत फिरायला सुरुवात करतो। (पत्रावळी म्हणजे पळसाची पाच सहा पाने काड्यांनी शिवून बनवलेले ताट)!
या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असत. त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठूर का असत? कोण जाणे ! फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत … आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरचे असते, अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत.

पत्रावळ ढेकळांवर ठेवली की ती सरळ कधीही राहत नसे. त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागे.
कशीबशी पत्रावळ सेट केली, तर वारा येई आणि ही बया इकडेतिकडे उडू लागे. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागे.
पत्रावळी स्थानापन्न झाल्या, की मीठ वाढणारा, अतिशय घाईत असणारा, येई आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडे. यांना पत्रावळीला काठ असतात हे माहित नसावे.
त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपथक येते. जिथे मीठ वाढलंय त्यावर नेम धरून बुंदी वाढायची, असा प्लान करून आलेले असत, दुष्ट साले!
सगळी बुंदी खारट होऊन जाई.

मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळे करेपर्यंत मोठया टोपलीत भात घेऊन दोघेजण पळत येत. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बशा असत. एकाच वेळी दोन पंगती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिगरखांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावत.
बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई.
वरण वाढणारी मंडळी बिनडोक असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून आलेले असत.
भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामाघुम होऊन जाई.

वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत वांगं उसळीची बादली नाचत येते. उसळीत घुसवलेले वग्राळे तर्रर्रर्ररीसकट बाहेर येई आणि पत्रावळीवर उताणे होई. यामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होई.

काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असे.
तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो….
एखादा ओघळ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाऱ्याच्या पायांखाली लोटांगण घालतो..
त्यात जरका सोसाट्याचा वारा आला तर गम्मत नका विचारू…

शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकिरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने या संभ्रमात असलेला जेवणारा “वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे” ही राकट, चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडात सारी!

बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागे. त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मणभर भाताची बशी बघायला चान्स नाही. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतून पळूनही जाई..

काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते, तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे.
आधीच बुंदी आणि उसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधीच सावळा विठठल बने….

बाराचे लग्न अडीच ला लागलेले असते, त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्ततः पसरलेले मीठ बोटांवर चोळून पत्रावळीची घडी करत.. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत आणि पाण्याच्या टँकरकडे धावत.
एकाच पाईपला ठिबक सिंचनच्या दहा नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे…

पहाटे ५ वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर एव्हाना अंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागत…..
येताना खिशात लपवलेला प्लास्टीकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार वाटत असावा…

२- ५ रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धूळयुक्त जेवण आणि एक प्लास्टिकचा ग्लास..😊

टीप: आपल्या सारख्या नव्या-जुन्या पिढीने…..
हे सगळं अनुभवणं कदाचीत राहूनच गेलं… असेल….
किमान नवीन पीढ़ीला पाठवा….
वारसा, वहीवाट, चालीरीती, इतिहास जीवंत राहील.!

☝👍😳😁🏡🪷🚩

Related Posts

म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

by whatsapp जनता
May 8, 2025
0

कुंभाराला म्हणाले "मडकं दे". तो पटकन xxx कडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका". खरं तर xxx लाही माहित नव्हतं...

Read more
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

by whatsapp जनता
May 8, 2025
0

💐सुधा नारायण मूर्ती आपला अनुभव सांगताना लिहितात :💐 "नुकतीच मी रशिया मधील माॅस्को येथे गेले होते. तेथे एक दिवस मी बागेत गेले....

Read more
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

by whatsapp जनता
March 18, 2025
0

आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...

Read more
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

by whatsapp जनता
March 18, 2025
0

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...

Read more
आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!
Devotional

आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!

by whatsapp जनता
March 1, 2024
0

औदुंबर नाव उच्चारताच दत्तगुरु आठवतात आणि दत्त गुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते, तिथे हा सोहळा कसा साजरा होतो बघा. आज औदुंबर...

Read more
भगवंताचं ATM
Life

आजची सावित्री डॉ. सौ.रीना कैलास राठी

by whatsapp जनता
February 29, 2024
0

शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र ! नाशिक...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

3 months ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

3 months ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

3 months ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.