सोने सोने करत बसू नका मैत्रिणींनो लोह किती आहे शरीरात हे ही तपासून बघा 🤩
शरीरातील लोह नीट असेल तर सोने चांदी घालून मिरवू ही शकाल 🤩
सारखेच सोन्यात गुंतवणूक करू नका कधीतरी लोहात ही गुंतवणूक करा 🤩
मनुके, गाजर, बीट, टोमॅटो, जमल्यास केशर, सुका मेवा हा सोन्या पेक्षा शरीरात जास्ती मोलाचा असतो हे ही समजा 🤩🤩
तू सखी इतके काम करतीस, थकतीस, सगळ्यांची मने राखतीस, कधीतरी वेळेला सण वार करत असताना नीट खात ही नाहीस 🤩
तेंव्हा हेच सांगणे आहे मुली, महिला ज्येष्ठ सगळ्यांना सोन्या च्या गुंतवणुकी सारखे लोहा त ही गुंतवणूक करा 🤩
तुम्ही उभ्या असाल तर घर ताजे तवाने राहील म्हणून गुंज भर रोज लोह तयार करा
शरीरास जपा,मनास जपा आणि रोज नव्याने सोन्यासारखा आरंभ करा 😂