फळांवर(Fruits) स्टिकर्स का लावतात?
स्टिकर्सवरील नंबरला प्लू कोड (PLU Code) असे म्हणतात.
प्लू कोड काय आहे?
प्लू कोड म्हणजे Price Look Up (PLU) कोड.हा क्रमांक भाजीपाला आणि फळांवर असतो तो आपल्याला सांगतो की ह्या वस्तूंचे उत्पादन कोणत्या प्रकारे झाले आहे.
सहसा फळांचे आणि भाज्यांचे उत्पादन ह्या 3 प्रकारात होते.
पारंपारिक पद्धतीने (Conventional Way),
सेंद्रिय पद्धतीने (organic Way)
संरचनेत बदल करुन (Genetically Modified one)
एक देशातून दुसऱ्या देशात जाणारे तसेच कोणत्या प्रकारे फळांचे उत्पादन झाले आहे हे आपल्याला ह्या स्टिकर मुळे कळते.
कसे दिले जातात PLU कोड?
जर क्रमांक 4 अंकी असेल तर समजावे की सामान्य शेती पद्धतीने ह्याचे उत्पादन झाले आहे.
जर क्रमांक 4 अंकी असेल आणि त्याची सुरुवात 9 ह्या आकड्यापासून असेल तर समजावे की उत्पादन सेंद्रिय पद्धतीने झाले आहे.
जर क्रमांक 5 आकडी असेल आणि त्याची सुरवात 8 पासून झाली असेल तर समजावे की हे उत्पादनच्या संरचनेत बदल केलेले आहेत अर्थात ते जेनेटिकली मोडीफाईड आहे.
जर क्रमांक 5 अंकी असेल आणि त्याची सुरवात 9 पासून असेल तर त्याचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने झाले आहे.
आता पुढच्या वेळेस आपण काही फळे आणि भाजीपाला घेणार तेव्हा हा PLU क्रमांक नक्कीच तपासून पहावा.
क्रमांक 5 अंकी असेल आणि 8 पासून सुरु होत असेल तर तो GM0 (Genetically Modified Fruit) पद्धतीने उत्पादित झाला आहे हे लक्षात घ्यावे आणि अशा भाज्यांना – फळांना घेणे टाळावे