१.D Dimer-यात वाढ झालेली आढळल्यास त्या पेशंटला ॲडमिट होऊन लो माॅलिक्युलर वेट हिपॅरिनचे इंजेक्शन द्यावे लागते.
यात झालेली वाढ रक्ताच्या गुठळ्या होत आहेत हे दर्शवते.(Thrombosis).
रक्ताच्या गुठळ्या शरीरात कुठेही होऊ शकतात.ह्रदयात झाल्यास हार्ट ॲटॅक येतो.मेंदूत झाल्यास पॅरालिसिस होतो.
या गुठळ्या जीवाला धोका निर्माण करतात.
२.LDH-यात झालेली वाढ पेशींची फार मोठ्या प्रमाणात हानी होत आहे हे दर्शविते.ही वाढ झाली असता लगेच ॲडमिट होणे आवश्यक असते.तसे न केल्यास फुफ्फुसाच्या पेशींची हानी होऊन
बरेच आठवडे ॲाक्सिजनवर रहावे लागते.
ह्रदय ,किडनी यांच्या पेशींची हानी होते.
- Serum Ferittin-यात झालेली वाढ शरीरात बॅक्टेरिया व व्हायरस खूप असल्याचे दर्शवते.जास्त वाढ झाल्यास जीवाला धोका संभवतो. इन्फेक्शन खूप जास्त झाले आहे हे समजते.
- Interlukin 6-यात झालेली वाढ ही फुफ्फुसाचे काम बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दर्शविते.अशा पेशंटला व्हेंटिलेटर वर ठेवावे लागते.
[: कोविदचे १९ –
३,४ दिवसात बरे वाटले नाही तर
CBC,ESR,CRP टेस्ट केल्यावर जर ESR, CRP वाढले असेल तर HRCT Chest (छातीचे स्कॅनिंग)केल्यास ८०% पेशंटस् चे निदान होते.
तरी बर्याचदा ESR,CRP नाॅर्मल असूनही पेशंटला बरे वाटत नसेल तर HRCT Chest केल्यास काही पेशंटस चे निदान होते.
HRCT Chest च्या रिपोर्ट मध्ये जर
Viral Pnumonitis दिसला तर लगेच कोविड ची ट्रीटमेंट सुरू होते व ॲडव्हान्स टेस्ट केल्या जातात
LDH,Serum Ferritin,Interlukin 6,
D Dimer.
RT PCR साठी स्वॅब दिला जातो.
स्वॅब चा रिपोर्ट पाॅझिटिव्ह येवो वा निगेटिव्ह ट्रीटमेंट सुरू झालेलीच असते.
बर्याचदा तो निगेटिव्ह येतो म्हणून कोविड नाही असे नाही.
स्वॅबच्या रिपोर्ट मध्ये पुढे सायकल थ्रशहोल्ड चा आकडा दिलेला असतो.
(सी टी व्हॅल्यू). तो जर २४ च्या आत असेल किंवा जेवढा कमी तेवढा तो पेशंट जास्त इन्फेक्शियस समजला जातो.
पेशंट २१ दिवसांपर्यंत इन्फेक्शियस असतो.२१ते २८ दिवसांपर्यंत त्याला काही प्राॅब्लेम निर्माण होऊ शकतात.त्यामुळे २८ दिवसांपर्यंत पेशंटने वेगळे रहावे. मला काहीच त्रास नाही असे म्हणून कामावर जाऊ नये.
ट्रीटमेंट संपली आता पुन्हा स्कॅन व स्वॅब टेस्ट करून घ्यायची का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे .कारण या दोन्ही टेस्ट बरेच आठवडे पाॅझिटिव्हच येतात.
२८ दिवसानंतर एकूण ३ महिने पेशंटने काळजी घ्यायची असते.
आजारपणाच्या काळात थोड्या थोड्या वेळाने जेवढे जाईल तेवढे खाणे आवश्यक असते.शक्यतोवर दूध भात ,दूधपोळी,दूध भाकरी, साधी खिचडी,फोडणीची खिचडी, वरण भात,भाज्यांचे सूप,राजगिरा लाडू ,साळीच्या लाह्याअसे खावे .मटन ,मासे ,अंडी खाऊ नयेत.औषधे खूप पाॅवरफूल असतात ॲसिडिटी वाढते.त्यामुळे साधेच जेवण असावे .तिखट,आंबट ही टाळावे .नारळ पाणी व फळे ही टाळावित .खोकला कफ वाढून त्रास होऊशकतो.फळे वाईट नाहीत परंतु ती ॲसिडच्या सहाय्याने पिकवली जातात त्यामुळे त्रास वाढतो.
बदाम, पिस्ते, अक्रोड,खजूर पण खावेत जरा शक्ती येते.आजारपणात पाॅझिटिव्ह विचार करावे.प्राणायाम रोज करावा .दिवसातून ४ वेळा वाफ घ्यावी ,४ वेळा मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या, २ वेळा दूध हळद घ्यावे.तोंडात लवंग ठेवावी.मास्क वापरावा.पेशंट ज्या खोलीत वेगळा रहात आहे तिथे हवा खेळती असावी. उजेड असावा.घरातील लोकांनी मास्क वापरावा.वाफ,गुळण्या कराव्यात .दूध हळद प्यावे. व Vit C, D,Zinc च्या गोळ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.ज्यांनी अजूनही घेतल्या नसतील त्यांनी त्या घ्याव्यात.डायबेटीस असलेल्या पेशंटस् नी त्यांच्या डायबेटीस च्या गोळ्या ,इन्सुलिन बंद करू नये.ब्लड प्रेशर, थाईराॅइडच्या पेशंटस् नी त्यांची औषधे नियमित घ्यावी.ज्या पेशंटस् ना रक्तपातळ रहाण्यासाठी ॲस्पिरिनच्या गोळ्या सुरू आहेत त्या सुरूच ठेवाव्यात.कॅन्सरच्या पेशंटस् नी त्यांची औषधे सुरूच ठेवावीत.केमोथेरपी ,रेडिएशन चालू असेल त्यात खंड पाडू नये. घेण्याचा कंटाळा करू नये.किडनीचे कार्य नीट व्हावे यासाठी ज्यांचे ब्लड युरिया ,सिरम क्रियाटिनिन वाढलेले आहे, प्रेशर,डायबेटिस,दमा,ह्रदयविकार,थाईराॅइड,किडनी विकार, कॅन्सरच्या पेशंटस् नी विशेष काळजी घ्यावी.
धन्यवाद!!!