आपल्याला लक्षात आलंय का ? आपण बदलतोय
बाहेरून आल्यावर
बूट-सॅन्डलसह थेट किचन मधे जायचं आपण टाळतोय.
घरभर पसरलेल्या चपला आता लक्षपूर्वक एका कोपऱ्यात ठेवतोय.
आपण थोडं बदलतोय.
बाहेरून आल्यावर घामाने भिजलेले कपडे, धुळीने माखलेले चेहेरे घेऊन आपण चहा कॉफी पाणी पीत नाही आहे.
बाथरूम मधून हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच सोफ्यावर बसतोय.
लहानपणी आपण ऐकलेले ‘हात पाय तोंड धुवून घे ‘ हे शब्द आपल्या लहानग्यांना सांगतोय.
आपण थोडं बदलतोय !
हॉटेलं बंद आहेत.
उपहारगृह अर्धवट सुरु आहेत. चार वेळचे खाणे घरीच सुरु आहे. घरच्या जेवणालाही चव असते हे आता कुठे समजतंय.
आपण थोडं बदलतोय
जेवण टीव्ही समोर नाही तर माणसांसमोर सोबत करायचं असतं हे आपल्याला रिअलाइज होतंय.
आपण थोडं बदलतोय
जेवताना पानाच्या कडेला असलेली चमचाभर चटणी, डांगर, तूप, गूळ, ठेचा, आपल्याला लहानपणात घेऊन जातोय.
मधेच चाललेलं लिंबाच्या लोणच्याचं बोट वेगळाच आनंद देतंय.
आपण थोडे बदलतोय
आईला बायकोला दिवसभर काय काम असतं ? याचा आत्ता उलगडा होतोय.
भांडी घासणे असो किंवा घासलेली भांडी लावून ठेवणे असतो दोन्हीला डोकं आणि संयम लागतो हे आता कोठे समजतंय.
आपण थोडे बदलतोय !
रस्त्यावर थुंकणे, खोकणे, खाकरणे चूक आहे हे आपल्याला आत्ता समजतंय. आठवणीनं दोन रुमाल आपण सोबत नेतोय.
आपण थोडे बदलतोय
शिंक आल्यावर तोंडावर धरलेला हात, कपडे, बाकडे, लोकलचे डबे आपले शरीर सोडून कोठेही पुसायचे नसतात हे आपल्याला समजतंय.
आपण थोडे बदलतोय
नमस्काराने सुद्धा प्रेम वाढतं आणि राम रामने आपुलकी वाढते.
त्यासाठी मिठ्या-पप्प्या घ्यायची गरज नसते हे आपल्याला जाणवतंय.
नमस्ते हा जागतिक ट्रेंड झाल्याचा अभिमान मन मिरवतंय.
आपले मन थोडंसं बदलतंय
स्वतःच्या आरोग्याची , व्याधिप्रतिकार शक्तीची काळजी घ्यायला शिकवतंय.
आपला किंवा आपल्या कुटुंबातील कोणाचाही आजार अंगावर काढू नका हे आपल्याला पदोपदी जाणवतंय.
आपण थोडे बदलतोय !
बदल व्हायला आघात झालाच पाहिजे असा नाही.
बरेच महिने, वर्ष नंतर बघू म्हणून कपाटात ठेवलेले शुगर, कोलेस्टेरॉल, बीपी, सोनोग्राफी, एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी, एम आर आय, स्कॅन इत्यादी रिपोर्ट बाहेर काढा.
तुम्हाला योग्य वाटेल त्या
डॉक्टरला कन्सल्ट करा.
कोरोनाने आपल्याला एक शिकवलंय.
उद्याची खात्री नाही !
आजचा दिवस आरोग्यपूर्ण असेल तर उद्याची खात्री आहे.
नसेल तर फार मोठे टेन्शन आहे.
एका दिवसात व्याधिप्रतिकारक शक्ती वाढवण्याची धडपड आहे.
वेळीच जागे होऊयात…
सशक्त शरीराचा, खंबीर मनाचा आणि आरोग्यपूर्ण हिंदुस्थानाचा पाया रचुया.
हे आजवर झाले नाही.
पण यापुढे होतील.
कारण आपण थोडं बदलतोय.