HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Articles

हक्काचं ठिकाण..

by whatsapp जनता
in Articles, Health
444 4
हक्काचं ठिकाण..
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

हक्काचं ठिकाण..
My Happy Place !!

“अग तुझा चेहरा आज असा का दिसतोय?”
” काही नाही गं…”
” नाही कसं ? काय झालंय..बोल न ..”
आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ तिच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं..
हेच.. हेच ते हक्काचं ठिकाण.. My Happy Place !!
फक्त आठवून बघा अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत ?? मनाला उभारी , खराखुरा विसावा देणारी .. एक एक आठवत चला.. एकदम फ्रेश वाटेल !! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील..कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसल्या जातं , भावा सोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी..तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा…sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं !!
अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात..आई वडील तर खास हक्काचेच.. त्याशिवाय मित्र ,मैत्रीण ,भाऊ ,बहीण,
भावजय,दीर,नणंद , cousins ,नातेवाईक .. कुणीही असू शकतं तुमचं हक्काचं ठिकाण , Your true Happy Place !!
जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी !! किंवा अगदी एखादा व्हॉट्सॲप ग्रुप सुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं !
निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं.. मन हलकं हलकं होऊन जातं.. अगदी मोरपिसासारखं !! तिथे कुठलाच आडपडदा नसतो किंवा show-off ही नसतो.. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं… कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतल्या जातंच पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केल्या जात नाही ! आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत.. मन मोकळं वाटतं..
“तुमको देखा , तो ये खयाल आया
जिंदगी धूप , तुम घना साया !!”
ही हक्काची ठिकाणंही अगदी अशीच..सावली देणारी ,विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या जीवाला आणि मनाला !!आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात.. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी..म्हणून जास्तं विश्वास !!
अशी हक्काची ठिकाणं अगदी जीवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त !! ती हरवायला नकोत,आयुष्याच्या गडबडीत.. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची !! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी..म्हणूनच “तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं” हे त्यांना नक्की सांगायालाच हवं .
कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल ? जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल?कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज !! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार ?
आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं… !! नाही का ?
खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना जरूर शेअर करा आणि सांगा ‘खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत’ !!

RelatedPosts

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

पाण्याची expiry date काय असते…

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ

Tags: happyHealthPlacepositivity

Related Posts

Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

by whatsapp जनता
March 18, 2025
0

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...

Read more
पाण्याची expiry date काय असते…
Articles

पाण्याची expiry date काय असते…

by whatsapp जनता
April 9, 2024
0

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजेexpiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी...

Read more
वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ
Health

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ

by whatsapp जनता
February 29, 2024
0

आजार म्हणजे काहीतरी कारणाने शरीराच्या नियमित कार्य पद्धतीत बदल करणारी स्थिती. यात वेगवेगळी लक्षणं शरीरात निर्माण होतात. या आजार निर्माण करणाऱ्या कारणांना...

Read more
स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!
Health

स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

NCD फार्मूला (Acu. Hr. अनिल जाधव यांच्या आरोग्यविषयक whatsapp groups साठी साभार संकलित.) सर्वांना आदरपूर्वक नमस्कार! या पोस्ट सोबत जी इमेज दिलेली...

Read more
समय के साथ चलो
Articles

घड्याळ परिवार

by whatsapp जनता
February 29, 2024
0

घड्याळ ...... जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या...

Read more
खुंट्या जवळचे दाणे
philosophy

तक्रारी थांबव कर्णा!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.