HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Money

मूल्य (Value) आणि शुल्क (Price)

by whatsapp जनता
in Money, Articles
398 8
मूल्य (Value) आणि  शुल्क (Price)
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

वकील सुद्धा मूल्य घेतात शुल्क नाही.

व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कामाचे मूल्य (Value) आणि शुल्क (Price) यातला फरक ओळखा.

RelatedPosts

पाण्याची expiry date काय असते…

घड्याळ परिवार

तक्रारी थांबव कर्णा!

Value vs. Price

एका जहाजामध्ये काहीतरी बिघाड होतो. यामुळे जहाज समुद्रात नेणे अशक्य होऊन बसते. जहाजाचे कर्मचारी सगळं जहाज तपासून पाहतात, पण त्यांना दोष काही सापडत नाही. अथक प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना अपयशच येतं तेव्हा ते जहाज बांधणी मधील तज्ञ व्यक्ती ला बोलावतात. तो इंजिनियर येतो संपूर्ण तपासणी करतो… जहाजाच्या एका पॅनल मधील स्क्रू ढिल्ला झालेला असतो, त्यामुळे संपूर्ण बॉडी मध्ये प्रॉब्लेम तयार झालेला असतो. इंजिनियर तो स्क्रू पुन्हा पक्का बसवतो आणि जहाज पूर्ववत होते.
जाताजाता तो इंजिनियर त्याचे बिल जहाज कंपनीकडे सुपूर्द देतो आणि निघून जातो. ते बिल असतं दहा हजार रुपयांचे. एक स्क्रू पक्का बसवण्यासाठी दहा हजार रुपये कंपनीला जरा जास्त वाटतात म्हणून ते त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या इंजिनियर कडे बिल दुरुस्त करायला पाठवतात. कर्मचारी जातो आणि इंजिनियर ला एक स्क्रू पक्का बसवण्याचे इतके बिल होऊ शकत नाही, बिल कमी करा असे सांगतो.

इंजिनियर त्या कर्मचाऱ्याच्या हातात नवीन बिल सोपवतो.
त्यात लिहिलेले असते स्क्रू पक्का बसवण्याचे शुल्क रु. १/- आणि कोणता स्क्रू ढिल्ला आहे हे शोधण्याचे मूल्य ९,९९९/-

यावरून तुम्हाला मूल्य आणि शुल्क (किंमत) यातला फरक लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो. मी एखाद्याला कन्सल्टिंग करतो तेव्हा त्यासाठी माझी कन्सल्टिंग आकारतो. त्यावेळी सुद्धा हि समस्या जाणवते. लोकांना वाटत कि दोन तास बोलायचे एवढे शुल्क कशाला. पण ते शुल्क नसते तर मूल्य असते माझ्या ज्ञानाचे, बुद्धीचे आणि वेळेचे. लोकांना समजावून सांगण्याच्या फंद्यात मी पडत नाही, कालांतराने व्यवसायात समस्या जाणवायला लागल्या कि ते पुन्हा माझ्याकडेच येणार असतात. ते ग्राहक म्हणून आपल्या फी ला शुल्क म्हणून पाहत असतात आणि आपण व्यवसायिक म्हणून आपले मूल्य ठरवत असतो.

असो… तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्य ओळखता आले पाहिजे. कित्येक ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि पारंपरिक कला असलेल्या लोकांकडून हाताने बनविलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत घेतल्या जातात. त्या उत्पादकांना आपल्याकडून पन्नास रुपयांना घेतलेली कलाकुसर बाहेर मार्केटमधे हजार रुपयांना विकली जाते हे माहीतही नसते. ते मिळेल तेवढे पैसे घेतात याचे कारण त्यांना त्यांच्या कौशल्याचे मूल्य माहित नसते. त्यांना फक्त त्यांच्या कामाची किंमत माहित असते. एखादा कलाकुसरीचा टेबल हजार रुपयांना मिळत असेल तर तोच टेबल एखाद्या मोठ्या ब्रॅण्डच्या नावाखाली लाख रुपयाला सुद्धा विकला जाऊ शकतो. कारण त्या ब्रँड ने आपल्या वस्तूचे मूल्य ठरवलेले असते किंमत नाही. रोल्स रॉयस कार मध्ये सात आठ कोटी खर्च करावेत असं काही नाही पण त्या ब्रँड चे मूल्यच इतके मोठे हे कि ती किंमतही तुम्हाला त्या गाडीसमोर फिकी वाटते. एखादी पेंटिंग करोडो रुपयांना विकली जाते याचे कारण तिचे मूल्य आहे, किंमत नाही.

कामाचे मूल्य मिळणं हि तशी सोपी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते, इतरांपेक्षा वरचढ व्हावे लागते, स्वतःचा ब्रँड बनवावा लागतो, इतरांकडे नसेल असे ज्ञान कौशल्य मिळवावे लागते… हे ज्यांच्यासाठी अवघड आहे त्यांना तसंही यश कमीच मिळतं. त्यामुळे यात तडजोड होऊ शकत नाही

कष्टाची किंमत मिळते, कौशल्याचे मूल्य मिळते. म्हणून कौशल्य आत्मसात करा. ज्या क्षेत्रात असाल त्यातले तज्ञ व्हा. अगदी बूट पॉलीश जरी करत असाल तरी त्यातले कौशल्य आत्मसात करा. लोक पॉलिश साठी दोन नाही दोनशे रुपये सुद्धा देतील.

आपल्या कामाचे मूल्य ओळखा, किंमत तर सगळेच करतात. तुम्हाला तुमच्या कामाचा परतावा शुल्क म्हणून नाही तर मूल्य म्हणून ज्यावेळी मिळायला लागतो त्यावेळी तुमची यशाकडे भक्कम वाटचाल सुरु झालेली असते हे लक्षात घ्या.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

Tags: LifeMoneyPriceValue

Related Posts

पाण्याची expiry date काय असते…
Articles

पाण्याची expiry date काय असते…

by whatsapp जनता
April 9, 2024
0

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजेexpiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी...

Read more
समय के साथ चलो
Articles

घड्याळ परिवार

by whatsapp जनता
February 29, 2024
0

घड्याळ ...... जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या...

Read more
खुंट्या जवळचे दाणे
philosophy

तक्रारी थांबव कर्णा!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?...

Read more
…प्रयत्न केल्याशिवाय तुला कळणार नाही‼️
philosophy

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा

by whatsapp जनता
September 30, 2020
0

चांगल्या सुखद आठवणीत जीवन जगावे म्हणतात. या आठवणी म्हणजे मनाचे औषधच. आजचा दिवस हा असाच मनाला उभारी देणारा. आजच्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या...

Read more
भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर
People

भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर

by whatsapp जनता
September 29, 2020
0

डॉ. रखमाबाई राऊत... (साळी समाज भगिनी) यंदा त्यांची १५५ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात...

Read more
…प्रयत्न केल्याशिवाय तुला कळणार नाही‼️
Relationships

अधिकमास

by whatsapp जनता
September 29, 2020
0

#लक्ष्मी आज मोघे काकूंची सकाळपासून कामाची गडबड चालू होती. अधिक मासाचे वाण घेण्यासाठी त्यांनी लेक जावयाला घरी बोलवले होते. सोबतच मुलाला आणि...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.