ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरील चालती बोलती पुस्तक असतात.
आयुष्यभर काबाडकष्ट करून जिव शिणलेला आयुष्य माळावर घातल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरी सारखे. गालावर सुरकुत्याचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेल्या आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कंबरेला आलेला बाक. जुनाट धोतर आणि पांढरा शुभ्र सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ.डोईवर पांढरी टोपी. पायात कातडी झिझलेल्या वाहणा दरिद्रीच दर्शन देणार्याच. डोळ्यावर दोरीने बांधलेला चष्मा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ. हातात काठी आणि मनात असंख्य अनुत्तरित प्रश्न. दुःखाच्या भवसागरात त्यांची डोळे ओले होतील पण ते कधीच ओले होणार नाहीत. किंवा बुडूनही जात नाहीत. म्हणूनच ही माणसं चालती बोलती पुस्तक असतात. गावाच्या कुशीत जन्माला येवून शिवाराच्या मातीत आनंदानेप्राण सोडणारे ना बीपी ना डायबेटीस नैसर्गिक जिवण अन नैसर्गिक म्रुत्यु सुख दुःखाच्या गप्पा आणि माफक अपेक्षा. कष्टाला नकार नाही अन सत्याला फाटा कधीच नाही. मायबाप हे कुलदैवत आणि पांडुरंग हा देव. आनंद झाला तरी बेभान नाहीत आणि दुःख झाले तरी गुडघ्यात मुंडके खूपसत नाहीत.
अशी माणसे पाहिजे की डोळे भरून येतात. मुंगी पासून ते माणसातल्या देवाची जाणिव हेच आजोबा करून देतात. आणि त्यांच्या अनुभवाचे बोल शिदोरी म्हणून स्वीकारले तर आयुष्यभर ती अनुभवी शिकवणीची शिदोरी म्हणून आपल्या कामी पडेल.
आज की औरतें
आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...
Read more