HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Articles

भगवंताचं ATM

by whatsapp जनता
in Articles, Devotional
412 4
भगवंताचं ATM
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

भगवंताचं ATM

दिवाळीत एक ७ – ८ वर्षाचा माझा एक छोटा मित्र माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला ” काका , तुम्हाला एक कोडं घालू का ?”. मी हो म्हटल्यावर त्यानी विचारलं ” काका ATM चा फुलफॉर्म सांगा.” मी म्हटलं , ” अगदीच सोपं आहे.

RelatedPosts

आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!

पाण्याची expiry date काय असते…

घड्याळ परिवार

(A) ऑल
(T) टाइम
(M) मनी.

माझं उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे चुकल्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर झळकला आणि तो म्हणाला , ” नाहीच मुळी. खरं उत्तर आहे,

(A) असेल
(T) तरच
(M) मिळेल.

मी पण त्याला अपेक्षित असलेला बावळट भाव चेहेऱ्यावर आणला आणि हसलो. आणि तो एखादा गड जिंकल्याच्या अविर्भावात , चेहऱ्यावर विजयी मुद्रा घेऊन दुसऱ्या काकाला ” मामा ” बनवायला निघून गेला.

या निरागस प्रश्नोत्तरामुळे मी मात्र खरंच विचारात पडलो.
त्यानी सांगितलेलं उत्तर किती खरं आहे आणि ते केवळ बँक आणि पैशाच्या बाबतीतच लागू आहे असं नाही तर माणसांच्या बाबतीतही ते किती यथायोग्य आहे हे लक्षात यायला लागलं.
बँकेच्या बाबतीत , पैसे सतत डिपॉझिट करून जितके पैसे डिपॉझिट करू तितकेच पैसे काढता येतात.

पण माणसांच्या बाबतीत मात्र याही पुढे जाऊन एका अद्भुत निसर्ग नियमाप्रमाणे एका गोष्टीचं डिपॉझिट करून दुसरी अधिक मौल्यवान आणि कितीतरी अधिक प्रमाणात गोष्ट मिळते.

व्यायाम डिपॉझिट केला तर आरोग्य परत मिळतं.

विश्वास डिपॉझिट केला तर निष्ठा परत मिळते.

प्रेम डिपॉझिट केलं तर समर्पण परत मिळतं.
कर्म डिपॉझिट केलं तर साफल्य परत मिळतं.

तेव्हा माणसाने स्वतःच्या किंवा इतर माणसांच्या बाबतीत केलेली जी डिपॉझिट्स असतील त्याप्रमाणे त्याला अद्भुत निसर्ग नियमानुसार कितीतरी अधिक प्रमाणात

(A) अपेक्षित
(T) ते
(M) मिळेल.

अर्थात, माणसांच्या बँकेतही आपली डिपॉझिट्स मात्र सतत करावी लागतात.

ही स्थिती माणसांची तर भगवंताच्या बाबतीत? तो तर चिन्मय जगद्नियंता. त्याला काय कमी आहे! मग त्याच्या बँकेचे नियम काय असतील?

ते समजण्याची कुवत माझ्यात नाही. संतच ते सांगू जाणे. पण संतांच्या शिकवणुकीतून एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे. भंगवंताच्या बँकेत आपण अगदी थोडी थोडी भक्ती समर्पण भावाने डिपॉझिट करत राहिलो तर , आपण न मागताही , भगवंताकडून

(A) आवश्यक
(T) ते
(M) मिळेलच.

पण भगवंताच्या बँकेची बम्पर ऑफर काय आहे माहित्ये ???

आपला अहं , तोही आयुष्यात फक्त एकदाच आणि कायमचा डिपॉझिट केला नं की त्या दयासागर ईश्वराकडून आपल्याला ध्यानी मनी नसताना प्रत्येक सुवर्णक्षणी कायमची अशी अनेक अनमोल बक्षिसे मिळत रहातात आणि राहतील…

(A) अलौकिक
(T) तेही
(M) मिळेल…

नामस्मरण करून रोज भगवंताच्या बॅंकेत डिपाॅझीट करत रहा आणि मग बघा काय फरक पडत जातो

🙏🏻🙏🏻🙏🏻

Tags: ATMdevotional

Related Posts

आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!
Devotional

आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!

by whatsapp जनता
March 1, 2024
0

औदुंबर नाव उच्चारताच दत्तगुरु आठवतात आणि दत्त गुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते, तिथे हा सोहळा कसा साजरा होतो बघा. आज औदुंबर...

Read more
पाण्याची expiry date काय असते…
Articles

पाण्याची expiry date काय असते…

by whatsapp जनता
April 9, 2024
0

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजेexpiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी...

Read more
समय के साथ चलो
Articles

घड्याळ परिवार

by whatsapp जनता
February 29, 2024
0

घड्याळ ...... जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या...

Read more
खुंट्या जवळचे दाणे
philosophy

तक्रारी थांबव कर्णा!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?...

Read more
…प्रयत्न केल्याशिवाय तुला कळणार नाही‼️
philosophy

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा

by whatsapp जनता
September 30, 2020
0

चांगल्या सुखद आठवणीत जीवन जगावे म्हणतात. या आठवणी म्हणजे मनाचे औषधच. आजचा दिवस हा असाच मनाला उभारी देणारा. आजच्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या...

Read more
लेडीज, डू यू हॅव इट इन यु?
Motivational

लेडीज, डू यू हॅव इट इन यु?

by whatsapp जनता
September 29, 2020
0

📖📖 लघुकथा 📖📖 लेडीज, डू यू हॅव इट इन यु? ✍🏻लेखिका-©® प्रिया जोशी (#आनंदाचे डोही) काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही सिरीयल मधे एक...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.