अंधारातून प्रकाशाकडे ………
..……प्रयत्न केल्याशिवाय तुला कळणार नाही…..‼️
मी खूप वर्षांपूर्वी ही तेजस्वी गोष्ट रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचली होती आणि ती मनाच्या कुपीत कायमची झाली ….
तेरा चौदा वर्षांचा अंध मुलगा… डेविड हार्टमन (David Hartman) आपल्या बाबांना मोठया उमेदीने विचारतो – बाबा .. एकदम मनापासून सांगा … मी कधी डॉक्टर होऊ शकतो का? स्वभावाने बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले बाबा आतून हलतात … एकदम गप्प होतात …खोल विचारात पडतात … काय सांगायचं आपल्या या अंध मुलाला … पण या अतिशय उत्साही आणि उमद्या मुलाचा तेजोभंग कसा करायचा …. म्हणतात …”A doctor, son? Well, you will never know unless you try, will you? डॉक्टर …मुला …. नक्कीच … प्रयत्न केल्याशिवाय कसं कळणार? तू करशील ना …
जन्मताच डोळ्यांच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन जन्मलेला डेविड आठ वर्षांचा होतो तेव्हा त्याला पूर्ण अंधत्व येतं … तेव्हा पासूनच तो आपल्या बाबांना … मी हे करू शकतो का… ते करू शकतो का … अशा अनेक गोष्टी विचारत राहतो …. दहा वर्षांचा असताना तो बाबांना विचारतो … बाबा… मी बेसबॉल खेळू शकतो का? वेल, चल .. प्रयत्न करूया … “Well, let’s try it and see,”… त्याच्या बाबांनी त्याला सुचवलं … त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला … बाबांनी तो बॉल जमिनीवरून फिरवत त्याच्या दिशेने सोडायला सुरवात केली … डेविड …हळू हळू बॉलच्या गतीचा आवाज ओळखून तो बॉल पकडायला शिकला … तो बॅटिंग शिकला … गवतावरून फिरत येणाऱ्या बॉलचा आवाज एकदम आतून ऐकून तो बॉल कॅच करायला शिकला …काही काळाने प्राविण्य मिळवता झाला ..
Realm of Possibility? काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात … या तत्वानुसार डेविडच्या कुटुंबाने दृढनिश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी करायला सुरवात केली… काही वेळा काहीच दिसत नसल्याने तो रडायचा आणि म्हणायचा “ममा …. मी काही करू शकत नाही … ” मग त्याची आई त्याला त्याला आपल्या कुशीत घेऊन म्हणायची … माहित आहे रे … डेविडची बहीण … बार्बरा मात्र कठोर होती … अर्थात त्याच्या चांगल्या साठी … तो त्याचं ब्रेल घडयाळ जर पहिल्या मजल्यावरच्या खोलीत विसरला … तर तो त्याच्या बहिणीला सांगायचा … जरा आणून देतेस का ? …. ती त्याला म्हणायची … तू जा आणि आण… तुला काय वाटतं … कोणीतरी कायम तुझ्या दिमतीला असणारे का ?
तर अशा गोष्टींमुळे डेविड मोठा होऊ लागला आणि त्याला नक्की कळलं की अंधत्व ही ट्रॅजेडी नाहीये… आणि नक्कीच त्याला आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास बळावत गेला. १३व्या वर्षी त्याने आई बाबा आणि बहिणीला सांगून टाकलं की मला डॉक्टर व्हायचंय ….
त्याने त्याच्या शिक्षणाचा मार्ग निश्चित केला … आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरु केला त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव Havertown’s High School मध्ये घातलं. सगळ्यांना Realm of Possibility हे माहित आणि मान्य होतं … तरीही डेविडची डॉक्टर … त्यातही
मनोदोषचिकित्सक (Psychiatrist) होणं …
त्या Realm of Possibility च्या नक्कीच शक्यतेबाहेरचं होतं .. त्यांना वाटतं होतं की डेविड नक्कीच नादान महत्वाकांक्षा बाळगतोय … कॉलेजमधले त्याच्या शिक्षकांनी देखील त्याला खूप सांगायचा प्रयत्न केला … तू का नाही इतर विषय बघत जे तुझ्या पात्रतेला योग्य आहेत … इतिहास … वगैरे .. डेविड म्हणाला … मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये ..
मला दिसत नाहीये, खरं आहे … पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व असतातच . माझा दृढ विश्वास आहे की जे कोणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत …. ते खरं तर अपंग आहेत .. मी
Psychiatrist व्हायचं ठरवलंय कारण मला माझ्यावर ठाम विश्वास आहे .. आणि मी डॉक्टर झाल्यावर माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकतो ..
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात त्याची भेट अत्यंत हुशार … हिरवे डोळे असलेल्या चेरील Walker या मेडिकलच्याच विद्यार्थिनींशी झाली.. नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं … १९७२च्या वसंत ऋतूत तो कॉलेजच्या चौथ्या वर्षात असतांना त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले … त्याने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केला … एप्रिलमध्ये त्यातल्या आठ कॉलेजनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला …
२७ एप्रिलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजच्या नकाराचं पत्र मिळालं … त्याला मनातून वाटतं होतं की हे कॉलेज त्याला नक्की प्रवेश देईल … डेव्ह … मनातून एकदम खचला आणि हताश झाला …. पण जे फिडाडेल्फीया मधलं दहावं कॉलेज होतं .. Temple University School ऑफ Medicine … Dr. M. Prince Brigham, असिस्टंट डीन आणि प्रवेशाचे मुख्य होते … त्यांनी डेविडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं … त्यांनी बोर्ड मिटिंग मध्ये सांगितलं की जर आपण ऑलम्पिकच्या समितीत असतो आणि शंबर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता … तर आपण नक्कीच त्याला धावू दिलं असतं … डेविडने अगोदरच खूप अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरीत्या करून स्वतःला सिद्ध केलंय … आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया तो कुठपर्यंत जातो … बोर्डच्या सदस्यांनी ते मान्य केलं …
दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या आईचा फोन आला .. ‘तुला एक पत्र आलंय .. ज्याची तू खूप वाट बघत आहेस’ …. तिचा आवाज भरून आला … तिला बोलता येईना … त्याच्या बहिणीने … बार्बराने फोन घेतला … आणि सांगितलं की तू तोडलंस .. You have done it … आणि तिला देखील अश्रू आवरले नाहीत … तुला Temple University ने स्वीकारलंय … आणि डेविड आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालायला लागला …
वाट नक्कीच बिकट होती आणि त्याला त्याची उत्तम कल्पना देखील होती … पण त्याला डोंगरमाथा आणि तिथून दिसणारं निसर्गाचं दिव्य रूप .. त्याचं ध्येय दिसत होतं
सुरवातीलाच त्याला Anatomy च्या इंट्रोडक्टरी कोर्सेच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या .. हातात रबराचे ग्लोज घालून तो अनेक मोठे अवयव चाचपून ओळखायला लागला … पण लहान अवयव विशेषतः nerve plexuses ओळखायला त्याला ग्लोज काढावे लागले .. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधिर झाली … हे सगळं चालू असताना डेविडने आपल्या घरात या विषयाला अनुसरुन असलेल्या अनेक विषयांची असंख्य पुस्तकं विकत घेतली … घरची लायब्ररी अति समृद्ध करायला सुरवात केली … या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिका विकत घेतल्या …
मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेविड आणि चेरीने लग्न केलं .. तिसऱ्या वर्षात असताना खरं आव्हान सुरु झालं … युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये रोग्यांना तपासणं … त्यांना ट्रीटमेंट देणं सुरु झालं .. त्याला X-ray बघता येत नसल्याने तो कान … डोळे … तोंड आपल्या सहकार्यंवाचून तपासू शकत नसे … त्याला ते X-ray चं वर्णन त्याचे सहकारी किंवा नर्स सांगेल त्याप्रमाणेच उपचार करावे लागत … तो त्यांच्यावर अवलंबून होता … पण डेविड अतिशय समर्थ माणूस होता .. त्याने Stethoscope आणि स्पर्श खूप विकसित केला …
२७ मे १९७६ ला त्याला मेडिकलची डिग्री मिळाली … त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली .. तो इतरांपेक्षा वेगळा नाहीये … त्याला अगोदर नाही म्हणणारे प्रोफेसर्स देखील आले होते … पदवीदान कार्यक्रमाला … ते म्हणाले …Devid is not normal … he is super normal …
अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर झाला …. त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ झाला … अनेक लोक त्याच्या जिद्दीवर … त्याच्या अथक परिश्रमांवर … दिगंत आत्मविश्वासावर भर भरून बोलले …
In presenting the founder’s award to David, RFB President John Castles praised him “for exhibiting a triumph of the human spirit .. माणसाच्या अत्युच तेजाचं हे दर्शन आहे … आपलं भाषण संपवताना ते पुढे म्हणाले ….. “With the example of Dr David Hartman before us, we feel renewed faith in the infinite possibilities of all people…
डेविडच्या या उदाहरणाने आपल्याला नक्कीच एक नवीन विश्वास मिळालाय …. माणसाच्या काहीही गोष्ट मिळवायच्या अमर्याद शक्यतांचा …. ” या अतिशय भारावलेल्या शब्दांनी सभागृहात आलेले सगळे लोक त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले … These eloquent words brought a standing ovation for David ….
डेविडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं … My Dad was right ..माझ्या बाबांचं बरोबर होतं … “You will never know unless you try”….प्रयत्न केल्या शिवाय तुला कळणार नाही …
खरंच आपल्याकडे सगळं आणि तेही भरभरून आहे … तरी आपण हे नाही ते नाही … म्हणून सारखे रडत असतो … डेविड सारखे लोक अक्षरशः आभाळाएवढे आहेत … त्यांच्या या गोष्टीतून आपल्याला किती प्रेरणा मिळते………