आपल्या महान Scientists पूर्वजांचा मित्र…कावळा…
…
…
‘कावळ्याला मृत व्यक्तीचा आत्मा दिसतो’, ‘कावळ्याला पिंडदान केल्यास तो अन्नभाग आपल्या पूर्वजांना मिळतो’ वगैरे गोष्टी ज्याच्या त्याच्या विश्वासाशी निगडीत आहेत, त्यामुळे त्या कितपत मान्य करायच्या हादेखील व्यक्तिगत प्रश्न आहे.
पण कावळा आणि पर्यावरणशास्त्र (Environmental Science) याची सांगड आपल्या महान पूर्वजांनी कशी लावली, त्यावर विश्वास ठेवायला कोणाचंही पुरोगामित्व (Progressive) किंवा प्रतिगामित्व (Regressive) आड यायचं काही कारण नसावं.
पितृपक्षात किंवा इतरही अंत्यविधींच्यावेळी आपल्या महान पूर्वजांनी कावळ्याला खूपच महत्व दिलेलं आहे. त्याची वैज्ञानिक कारणं अनेक आहेतः-
तुम्ही कधी वड-पिंपळ हे वृक्ष लावले आहेत किंवा कोणाला लावताना पाहिलंय का? किंवा नर्सरींमधे वड-पिंपळाच्या बिया / रोपं मिळतात का?
याचं उत्तर नाहीच मिळेल.
वड-पिंपळ वृक्ष लावायचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला यश येत नाही. निसर्गानं यांच्या रोपणाची (Plantation) व्यवस्था फार मनोरंजकपणे केलेली आहे. या वृक्षांच्या बिया कावळा खातो आणि त्याच्या पोटातच त्यावर रासायनिक प्रक्रिया होते. नंतर त्याच्या विष्ठेतून या प्रक्रिया झालेल्या बिया बाहेर पडल्यावरच त्या रोपणासाठी सक्षम होतात आणि मगच वड-पिंपळ वृक्षांचे अंकूर फुटतात.
पिंपळ एकमेव असा वृक्ष आहे जो २४ तास ऑक्सिजन उत्सर्जन करतो आणि वडाच्या औषधी गुणधर्मांबद्दल काय बोलावं?
या दोन वृक्षांचं संवर्धन करायचं असेल तर कावळ्यांचं रक्षण व्हायला हवं. ते कसं होणार?
कावळ्याची मादी श्रावण-भाद्रपदाच्या आसपास अंडी घालते आणि पिल्लं बाहेर येतात. त्यानंतर लगेचच येत असलेल्या पितृपक्षादरम्यान पिल्लांना सकस आहार मिळून त्यांची निकोप वाढ व्हावी यासाठी आपल्या महान पूर्वजांनी घराच्या छतावर श्राद्धान्न ठेवण्याची व्यवस्था लावून दिली. श्राद्धान्नातील पदार्थ आठवून त्यांचा विचार Nutritional point of viewनं करुन पहा म्हणजे मग ते किती सकस असतं याची साक्ष पटेल.
त्यामुळे तुमचा पितृदेवता वगैरेंवर विश्वास नसला तरीही वड-पिंपळाचं आणि पर्यायानं निसर्गाचं संवर्धन व्हावं यासाठी तरी श्राद्ध करण्यास किंतुपरंतु नसावा! आज आपण जे वड-पिंपळ वृक्ष पहातो तो आपल्या पूर्वजांनी श्राद्ध केलं होतं म्हणून दिसतायत्. अश्याप्रकारे त्यांना पाहून पूर्वजांचं स्मरणही होतं.
आपल्या महान पूर्वजांनी निर्माण करुन ठेवलेल्या प्रथांची टर उडवण्याआधी त्यामागील विज्ञान जाणून घ्या म्हणजे मग त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल आदरच वाटू लागेल. सध्याच्या विज्ञानाचा विचारही नव्हता तेंव्हा आपल्या अत्यंत प्रगत Scientists पूर्वजांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगलेला होता.
(समीर अनिल थिटे)