मी 41 वर्षाचा आहे. माझी Salary 12 लाख वार्षिक आहे.
मी सध्या चेन्नई मध्ये राहतो आणि मी या salary वर पूर्णपणे समाधानी आहे. त्याची खालील करणे आहे. ते पाहू –
1. मी कधी 70 -80 लाखाचं मोठ घर घेतल नाही. मोठं घर घेवून गाजावाजा करण्यात मला मुळीच INTEREST नाही. मोठ्या घराच्या प्रशंसेसाठी 35 हजाराचा महिन्याचा EMI भरून कर्जाच tension घेवून रोजचा जगण्याचा आनंद गमवला नाही.
- त्यापेक्षा 70-80 लाखाचं घर 10,000/- Rent ने घेतलं. जे माझ्या ऑफिसच्या जवळच्या अंतरावर आहे. ज्यामुळे माझा traffic चा त्रास, पाठदुखी होत नाही. मी जेंव्हा जेंव्हा ऑफिस बदलतो तेंव्हा तेंव्हा मी माझं घर सुद्धा बदलतो. माझा स्वतःच घर असतं तर हे शक्य नव्हतं. माझे काही colleagues 2-2 तास सकाळी आणि संध्याकाळी 40kms प्रवास करून ऑफिस ला येतात. हा प्रवास चेन्नई च्या ट्राफिक मध्ये आणि गरम वातावरणात किती त्रासदायक आणि irritating असतो सांगतात.
- माझे colleagues जे 90 मिनिटांचा प्रवास करून आल्यानंतर कामावर योग्य प्रकारे focuse करता येत नाही. त्यामुळे चांगले प्रोजेक्ट त्यांच्या हातून जातात. इच्छा नसतानाही साध्या प्रोजेक्ट वर काम करावे लागते. जर rent वर घर घेतले तर आपल्या वेळेत Flexibility येते. त्यांमुळे मी माझा Quality Time माझ्या परिवारासोबत घालवतो.
- माझी 20,000/- Mutual Funds मधील गुंतवणूक हि Appartment खरेदी करून येणारे Rental Income पेक्षा जास्त Returns (परतावा) देते.
- 25,000/- घरखर्च- Petrol, Electricity Bill, Milk, TV, Internet, Grocery, Vegetable, Maid, Meat ETC.
- दर महिना 6000 रुपयांची एका Gold Scheme मध्ये गुंतवणूक माझ्या Wife च्या इच्छेमुळे.
(मला त्या Scheme गुंतवण्याची मुळीच इच्छा नाही पण काय शेवटी बायकोच्या पुढे जाता येत नाही.)
- 2000/- माझ्या आज्जी ला देतो जी एकटी गावी राहते.
- 3000/- माझ्या मुलीच्या शाळेच्या शिक्षणासाठी.
9. 14,000/- eating out, shopping, outing साठी.
- शिल्लक राहिलेले 15,000/- अचानक येणारा खर्च, हॉस्पिटल चा खर्च, घरगुती कार्यक्रमासाठी राखीव.
- मी क्रेडीट कार्ड वापरत नाही. मी EMI वर कोणतीच गोष्ट खरेदी करत नाही. माझ्यावर अजून कसलेच कर्ज नाही. मला महिना अखेरीस पैश्याच्या तंगीचा प्रोब्लेम येत नाही. महिना अखेरीस सुद्धा मी एखादी urgent गोष्ट घेण्यासाठी salary जमा होण्याची वाट पहावी लागत नाही. मागील महिन्याच्या savings मधून मी ती गोष्ट खरेदी करू शकतो.
12. माझ्याकडे 125cc ची bike आहे. जी पाच वर्ष जुनी आहे तरीही मी त्यात आनंदी आहे. मला दोन लाखाची Royal Enfield Continental GT खूप आवडते जी मी माझ्या savings मधून एका single payment मध्ये सुद्धा घेवू शकतो. पण मी घेत नाही. कारण तिची मला सध्या गरज नाही. आणि सोबत तिचा maintenance इतर खर्च जो माझ्या खिशातून अधिक पैसे काढून घेतो. जर 125cc bike वर सुद्धा तितकाच सुखकर प्रवास होत असेल तर मी ती खर्चिक bike का घेवू.
- माझ्याकडे 1000cc ची Hatchback car आहे जी मी आणि माझ्या परिवारासाठी sufficient आहे.
- मी Restaurants/Shopping मध्ये जास्त खर्च करत नाही. ते पैसे मी सहलीसाठी वापरतो. शक्य तितक्या नव्या ठिकाणी सहलीसाठी जाऊन येतो ((beaches, temples, amusement parks , new cities). सहलीसाठी माझी साधी कार असते सोबत घरून घेतलेले food असते. यात परिवारासोबत वेळ घालवतो.
- साधी आणि simple जगण्याची पद्धती जास्त कमावणाऱ्यापेक्षाही जास्त सुखी ठेवते.
- कित्येक श्रीमंत व्यक्ती आहेत जे मीठ (bp) व साखर (Sugar) एकत्र असलेलं जेवण करून शकत नाहीत. याचा जरूर विचार करा.