फ्लू चे थोडीफार लक्षण असलेले पेशंट मी काल पावसात भिजलो होतो, थंड पाणी पिलो होतो, मला हे पावसाळ्यात नेहमी होतं.
मला अॅलर्जी आहे. असले कारण देवून टाळतात.
कोरोनाबद्दल असलेल्या अफवांमुळे नुकसान पेशंट चे होते.
पेशंट ने टेस्ट केली नाही आणि किरकोळ औषधांनी तो बरा झाला तर त्याच नशीब चांगलं पण तो त्याच घरात अजुन २-३ लोकांना ते इन्फेक्शन देतो त्यात एक पेशंट तरी असा असतो जो नंतर सीरियस होता , पैसा आणि वेळ जातो कदाचित खूप उशीर केला तर जीवही.
टेस्ट चुकीची आहे असे म्हणणारे खूप मूर्ख आहेत
पण ज्याच्या घरी करोनामुळे कोणी जीव गमावला आहे त्यांना आयुष्यभर पस्तावा राहणार की आपण लवकर टेस्ट केली असती तर त्याला वाचवू शकलो असतो.
पेशंट हा डॉक्टर नाहीये तो टेस्ट करायला मागेपुढे बघणार पण आज अजूनही खूप डॉक्टर पेशंट च्या टेस्ट पहिल्या ३ दिवसात करत नाहीत कारण पेशंट किरकोळ मेडिसिन ने बरा होईन, आपण टेस्ट करायला सांगितली तर तो दुसऱ्या डॉक्टर कडे जाईन, माझ्यावर नाराज होईन, अजुन पेशंट चां ऑक्सिजन चांगला आहे गरज काय, छातीचा X ray normal चांगला आहे अश्या कारणांमुळे प्रत्येक जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर ला वाटते
३ दिवसांनी बघू आजार वाढला तर टेस्ट करू असा विचार करून डॉक्टर मेडिसिन लिहून देतात.
इथेच पेशंट च मोठं नुकसान होत. Symptomatic उपचारामुळे त्याला थोड बर वाटत आणि तिसऱ्या दिवशी पेशंट टेस्ट करत नाही. हळू हळू फुफ्फुसात नुमोनिया वाढायला लागतो. फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्या मध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासाठी चालू होतात.
ही प्रक्रिया एवढी स्लो असते की बऱ्याच वेळा ऑक्सिजन ९० च्या खाली गेला तरी त्याच्या लक्षात येत नाही आणि किरकोळ लागणाऱ्या दमामुळे तो थकवा आला असेल म्हणून त्या कडे दुर्लक्ष करतो. जेव्हा हा ऑक्सिजन ८८-८५ पर्यंत पोहचतो तेव्हा पेशंट त्रास व्हायला चालू होतो आणि तो पुन्हा त्या डॉक्टर कडे जातो तेव्हा दोघांच्या लक्षात येते खूप मोठी चूक झाली आणि आता अडमिट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नसतो.
खर्च, मनस्ताप आणि जीव या तीनही गोष्टी शेवटी नशिबाला येतात. हेच जर ऑक्सिजन ९२-९५ असता अडमिट केलं तर पेशंट ३ ते ४ दिवसात बरा होतो तेही खूप कमी खर्चात पण तेच ८५-९० ला दाखल झाला तर ८ ते १२ दिवस लागतात आणि जीव जाण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे पहिल्या ३ दिवसात RTPCR कीवा rapid antigen टेस्ट करा आणि पुढचे नुकसान टाळावे.
टेस्ट निगेटीव्ह आली म्हणून गाफील राहू नका आणि ऑक्सिजन कमी असेल तर फुफ्फुसाचा CT scan Karun infection तपासून घ्या आणि कन्फर्म करा. एवढ्या गोष्टी प्रत्येक जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर ने पाळल्या तर महाराष्ट्राचा death rate नक्की कमी होईन.
चला हरवु कोरोंनाला