#कथा
#कुंची,…
©स्वप्ना…
दाराची बेल वाजली,…समोर दोघे लग्नाच्या पोशाखात,…
इंदुआईच्या लक्षात आलं,…ज्याची भीती होती तेच केलं आपल्या पोराने,..खरंतर हे समाजसेवेच वेड आपल्यातलच आलं आहे त्याच्यात,.. पण आता हे नवरोबाच्या पचनी पडायला पाहिजे ना,…आपल्या तिसऱ्या लेकाने अनाथाश्रमातील पोरगी घराण्याची सुन केली आहे,…आपल्या गारमेंट फॅक्टरीत एकदम वेगळी कलाकुसर अगदी युनिक पीस बनवणारी हि पोरगी बसलीच आपल्या सर्वेशच्या डोक्यात,..आपल्याला सांगितलं तेंव्हाच आपण म्हंटलो होतो,.”पप्पांना नाही पटणार हे सगळं,…आणि आपल्या दोन्ही सुना चांगल्या श्रीमंत घरातल्या त्यात हि ऍडजस्ट करणं म्हणजे अवघड आहे एकंदरीत तू जे म्हणतोस ते होणं,..” पप्पांच्या कोर्टात तर केस दोन मिनिटात निकाली निघाली होती,..नाही
कारण गरिबापेक्षा अनाथ मुलगी सुन करायची,..हे त्यांच्या मनाला पटत नव्हतंच पण सर्वेशचं म्हणणं वेगळंच होतं,…”पप्पा अहो ती अनाथ हा तिचा दोष नाही,..ती हुशार आहे,..आणि मला वाटतं खरा पुरुषार्थ अश्या स्त्रियांना चांगलं आयुष्य देणं ह्यात आहे,..”बरेच दिवस अबोला झाला आणि आता समोर शेवटी तरुण रक्ताने जे करायचं तेच झालं,…इंदूबाई जरा गडबडल्या त्यांना बघून तेवढ्यात मागुन करारी आवाजात नवरोबा म्हणलेच,”तुम्ही बाजुला व्हा कलाबाई करतील औक्षण…”
कलाबाई ज्यांनी सर्वेशला सांभाळलं घरातल्या विश्वासु नोकर होत्या,..”त्यांना वाईट वाटलं पण पर्याय नव्हता,..त्यांनी औक्षण करून सुन घरात घेतली,..”
इथून संघर्ष सुरू झाला,…सासऱ्यांनी फर्मान काढलं उद्या पासुन हिने फॅक्ट्रीत यायचं नाही,…ती हिरमुसली,..नवनवीन ड्रेस डिझाईन करण्यात ती रमून जायची,..हिच्यामुळे ह्यांचा ब्रँड खरंतर फॅशनच्या जगतात जास्त फेमस झाला होता,..पण आता ते सगळं थांबलं,..ती खुप रडली एक सुख पकडताना एक उडालं फुलपाखरासारखं ,..त्याने समजावलं ते मुख्य मालक आहेत माझं ऐकणार नाहीत,..काहि दिवस थांब लवकर मार्ग काढू,…घरात कोणी तिच्याशी बोलत नव्हतं,..दिवस फार अवघड चालले होते,..तेवढी कलाबाई मात्र साथ देत होती,…त्यात दिवस राहिले,…सासुबाई नवऱ्याला दबून असल्याने फार मोकळ्या राहात नव्हत्या पण त्यांना मुलाच्या ह्या निर्णयाचा आंनद होता,…कारण दोन्ही सुना माहेरची टिमकी नेहमी गाजवत तस ह्या बिचारीच काही नव्हतं,…
सुन अनाथ असल्याने बाळंतपण
इंदुबाई आणि कलाबाईनेच केलं,..मुलगा झाला त्यामुळे वातावरण तसं आनंदी होतं,..तिचं वागणही कोणी कसही वागलं तरी शांत होतं आहे त्यात आनंदी असायची ती,… हे सासुसासरे बघत होते,…बारशाला सासऱ्यांनी विचारलं तिला,…”काय पाहिजे तुला गिफ्ट,..?”ती उदास हसली,”मला माझं स्किल वापरू द्या,..माझं कौशल्य माझं जगणं आहे,..”
सासरे तयार झाले पण अट घातली,”आमच्या चालु प्रॉडक्ट्स वर नको तुझं स्किल काहितरी नवीन कर मग मंजुरी देतो तुला,..”तिला खुप आनंद झाला,..पण नवीन काय,.?ड्रेस,साड्या तर हे डिझाईन करतात,..खास ब्रॅंडवर ह्यांचा माल जातो,..आपण काय वेगळं करावं,..?”
ती विचारात आणि कलाबाई आल्या,…हातात पेपरच्या गुंडाळीत काहीतरी घेऊन,…म्हणाल्या,”मी मुद्दाम बारसं संपल्यावर आले,…माझी छोटी भेट सगळ्यांसमोर द्यायला लाज वाटली असती मला,…त्यांनी तिच्या समोर गुंडाळा उघडत त्यातुन रंगीत तुकड्यांची सुंदर कुंची काढली,…आणि ती बाळाला घालत म्हणाल्या,आजकाल पोरी वापरत नाही हे पण हे फ़ार छान असतं बाई,..ह्याने कान तर झाकतात पण पाठीवर पडणार हे कापड आणि त्यातलं अस्तर त्या नाजुक जीवाला,..वारा, गारठा ,ह्यापासून वाचवतो आणि त्या लेकराला ते पाठीवर असल्याने मऊ,उबदार हात असल्या सारखं वाटतं,..”
ती एकदम खुश झाली मावशी मला शिकवा हि कुंची,..उद्याच शिकवून द्या,…
सासूबाईंच्या लक्षात आलं,..आकाशात उडण्याचं ध्येय आता हिला मिळालं,..हि आता स्वत्व सिद्ध करेल,…एका कुंचीतुन इतर सुंदर डिझाईन तिच्या डोक्यात आले,..ती सासऱ्यांनाच म्हणाली,”मला फक्त फॅक्ट्रीतून जे कपड्याचे तुकडे शिल्लक आहेत ते द्या मी करून दाखवेल वेगळं काही,..”
भरभर भरभर रंगीबेरंगी कुंच्या तयार झाल्या,..सहज फेसबुकवर कुंची नावाचं पेज उघडलं आणि त्यावर हेडिंग फक्त लिहिलं… “आपल्या बाळाला सतत द्या उबदार माया..”
असंख्य ऑर्डर मिळाल्या,.. हिने अनाथाश्रमात जाऊन बऱ्याच मुली शिवणासाठी तयार केल्या,.. कुंची डॉट कॉम,..दूरदूर देशात गेलं,..सर्वेशने तिला सुंदर शॉप उघडून दिलं,.. दुकानाला नाव दिलं ” उबदार माया..”उदघाटनात सासरे म्हणाले,”आपण चुकतो बऱ्याच वेळा,..प्रतिष्ठेच्या दबावाने कदाचीत समाजाला घाबरून,..पण वेळेने मला लवकर चांगल्या विचारांची कुंची घातली म्हणून माझ्या सुनेची हि प्रगती झाली,..”
सुनबाई बोलायला उभी राहिली,..”अनाथ असणारी माणसचं सांगु शकतात उबदार मायेचं महत्व कारण त्यांच्या आयुष्यात ते नसतं,.. पण मला माझ्या नवऱ्याने,सासु सासऱ्याने चॅलेंज दिलं म्हणून मी हि उबदार मायेची वाट तरी शोधू शकले,.. पण विशेष कौतुक कलाबाईंचं आहे,..माझ्या लेकराला त्या मायेने कुंची घेऊन आल्या,..त्यामुळे माझा आज मोठा बिझनेस उभा राहिला ह्याही पेक्षा मला त्या दिवशी कौतुक वाटलं कि माझ्या सारख्या अनाथ मुलीला त्यांनी साथ दिली मायेची कुंची मला त्यांनी ह्या घरात आल्यापासुन घातली म्हणून तर आज मी इथे पोहचले,…खरंतर अश्या उबदारमायेची कुंची प्रत्येकाला हवी असते,..बस ती घालणारी माणसं आजुबाजुला असावी नाही का,..??
शॉपचं उदघाटन झालं होतं आणि सगळ्या कुंच्या एकमेकांवर मायेची ऊब धरत होत्या,..😊
उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!
डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...
Read more