वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते.मग ती कशीही असो कारण,कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो .आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो.
संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.
एकदा गाढव वाघाला सांगतो गवत पिवळे असते.वाघ गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला.
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते…
तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?
सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..
आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो.
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, “की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली…
Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!