केवळ आर्थिक परिस्थिती
चांगली असून उपयोग नाही
मनस्थिति ही चांगली पाहिजे
म्हणून सकाळी व्यायाम केला पाहिजे ……
शरीर फिट तर मन फिट
नाही तर काय ……..
सगळं चांगलं असूनही
घरात नेहमीच किट किट
पर्यटनाला जायचं म्हणजे
प्रकृति चांगली असली पाहिजे
कपाळावर आठ्या-गाठया नाही
चेहऱ्यावर रौनक असली पाहिजे
आंबट चेहरा करुन
अजिबात बसू नका
अन तरुणपणी विनाकारण
म्हाताऱ्या सारखं दिसू नका
आनंदी , खेळकर
टवटवित रहावं
म्हणून सकाळी व्यायाम केला पाहिजे ……
गुढघ्याच्या ” वाट्या तड़कलेल्या ”
डोक्याच्या पत्त्या सरकलेल्या
थोडं काही वेगळं खाल्ल की
ऍसिडिटी , मळमळ , उलटया
अरे काय भल्या माणसा
कसं व्हावं तुझं ?
हे डोंगर ,झाडं, समुद्र
कोणासाठी आहेत ?
तुझं आपलं एकच
” मी फार बिझी आहे ”
वेड्या ……..,
तब्येतीची काळजी घे कुटुंबासाठी वेळ दे
घरासाठी झटणाऱ्या
बायकोला ‘ भेळ ‘ दे
छोट्या छोट्या मागण्या कडे
दुर्लक्ष करु नकोस
नेहमीच तिरकं चालून
पापाचा घड़ा भरू नकोस
अडचण चालु आहे
असं तुन-तुन वाजवू नकोस
” मानसिक ” आजारानं
खंगून जाऊ नकोस
निसर्गाच्या जवळ जा
थोड़ी तरी मजा कर
शंख आणि शिंपल्याना
कधी तरी हातात धर
व्यायामाचा कास आता
कधीही सोडु नको
आणि आरोग्य बिघडलं म्हणून
सारखं सारखं रडू नको..