एका डॉक्टर ची आई काय म्हणतेय ते ऐकाच जरा….
“मी ही पाठवलंय माझं लेकरू युद्धाला…”
अहो, मी सांगते एक गोष्ट तुम्हाला
मी ही पाठवलंय माझं लेकरू युद्धाला…
खुशाल आहे असं म्हणून,
रोज मला हसवतं,
तुम्ही लोकं बाहेर नका निघू म्हणून ,
रोज बजावतं,
एवढं घाईगडबडीत पण ,
छोट्याचा अभ्यास विचारतं,
म्हणत असतं रोज,
तुम्हाला माझी काळजी कशाला-
हो मी ही पाठवलंय माझं लेकरू युद्धाला..
स्वतःचा जीव धोक्यात टाकून,
आपली ड्युटी बजावतोय;
झालाच corona वगैरे तर
‘ये तो चलता रहता’ म्हणत ,
आमचच सांत्वन करतोय;
तरीही , तरीही…..
आपल्यासारखेच बरेच लोक येतात ,
त्याला मारायला,
शिवीगाळ करत त्याचे कपडे फाडायला ,
हो मी ही पाठवलंय माझं लेकरू युद्धाला…
एक गोष्ट सांगते हो तुम्हाला,
तुमच्यासारखीच मी एक आई
आणि
तुमच्या लेकरासारखच प्रिय मला माझं लेकरू ,
पण, तरीही ‘तू फक्त लढत राहा’ ,
एवढाच बोध घेऊन गेलय हो ते कामाला,
हो मी ही पाठवलंय माझं लेकरू युद्धाला..
शेवटी एवढंच मागणं मागते हो मी
भलेही नका देऊ त्याला ,
पारितोषिकं, पदकं आणि मानसन्मान..
शूरवीर आहे ते पहेलेच,
करत आहे ते आपले नित्यनियमाचे काम
फक्त असू द्या हो जाणीव ,
त्याच्या त्यागाची तुम्हाला… ,
मी ही पाठवलंय माझं लेकरू युद्धाला…