अत्यंत स्वरूपसुंदर अभिनेत्री स्वरूप संपत
ही ‘ये जो है जिंदगी’ या नितांत सुंदर मालिकेची नायिका आज जगातील पहिल्या दहा सर्वश्रेष्ठ शिक्षकांमध्ये एक आहे. इंग्लंडमध्ये तिने Ph. D आणि तीही संपूर्ण शिष्यवृत्तीवर मिळवली आहे. १७९ देश, दहा हजार स्पर्धेतील सहभागी एकूण शिक्षक यातून तिची निवड झाली आहे. ‘जीवनकौशल्ये’ यावर तिचे प्रभुत्व असून अनेक शाळांमध्ये तिने कार्यशाळा, शिबिरे व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन एक अद्भुत कामगिरी केली आहे.
मिस इंडिया ही स्पर्धा तिने जिंकली व नंतर त्यांचे परेश रावल यांच्याबरोबर लग्न झाले. फार चांगले आणि उच्च विचार व मुलांविषयी प्रचंड प्रेम आणि आस्था असलेली एक आई अशा शब्दात तिनी स्वतःचे वर्णन केले आणि ती तशी वागलीही आहे आणि वागतही आहे, हे अत्यंत विनम्र भावाने पण अभिमानाने ती सांगते. परेश रावल यांनी ती Ph. D. करून आल्यावर तिला विचारले की, आता तु कोणते काम करणार आणि किती पैसे मिळवशील ? हा प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, इतके इतके पैसे मिळविन. तर परेश त्यांना म्हणाले, की तू शिक्षक म्हणून काम करणार असशील, तर एकही पैसा घेऊ नकोस. आपल्याकडे पैसे भरपूर आहेत. आणि त्यानी दाखवून दिले कि, खरोखरच ती नुसती स्वरूपसुंदर नसून मनाने देखील तितकीच सुंदर आहे. हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.
आजतागायत तिने एकही पैसा न आकारता मोफत सर्व काही केले आहे. अत्यंत द्वाड मुले आणि एक वर्गात अजिबात न बोललेली मुलगी व तिच्यात त्यांनी केलेले परिवर्तन पाहून सर्व शिक्षक आश्चर्यचकित कसे झाले, हे मुळातून ऐकण्यासारखे होते.
Ph. D.साठी प्रवेश मिळाला, पण संपूर्ण शिष्यवृत्ती केवळ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना पत्र लिहून कशी मिळवली व त्यानंतरचा त्यांचा बेस्ट टिचर हा प्रवास त्यांच्याच शब्दातून ऐकण्यासारखा आहे.
एका मुलाखत घेणाऱ्या निवेदिकेने तिला प्रश्न केला की, लोकांचा असा समज असतो ना की, तुम्ही सिनेमा जगात वावरणाऱ्या, घरी नोकर-चाकर असतील, परेश रावळ यांच्या पत्नी आहात, तर तुम्हाला काय वाटते ? वगैरे..
त्यांनी उत्तर दिले, ‘I am typical middle class Indian woman and I am above all Indian mother and I am proud of it’. तिने मुलांच्या शिक्षणासाठी जे बदल करायचे आहेत, त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिले आहेत आणि त्यावर सरकार विचार करेल असा विचार देखील बोलून दाखवला. ही सर्व मुलाखत तिने मराठी भाषेत बोलून दिली हे विशेष.
एक अभिनेत्री, मिस इंडिया, ते डॉक्टरेट, एक जागतिक दर्जाची शिक्षिका आणि मुलांच्यात रमणारी एक आई अशी सर्वांगसुंदर स्त्री असा फार फार सुंदर प्रवास करत स्वतःबरोबर इतरांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या या स्वरूपसुंदर शिक्षिकेस शतशः प्रणाम.
आज की औरतें
आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...
Read more