काहिही आणि कितीही करा…?????
शेवटी आपण जेथे होतो.. तिथेच आहोत !
लहानपणी लोकांना हॉटेल मध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं. आपण ही खावं पण घरचे म्हनायचे,
…ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं.
मोठा झाल्यावर मग हॉटेलचं खायला लागलो, तेव्हा मात्र आरोग्याच्या भितिने लोकं घरातले खाताना दिसू लागली..
म्हणजे, शेवटी आपण तिथेच आहोत…!
घरात गावी मातीच्या मडक्यात शिज़लेला भात मातीच्याच ताटातुन खाताना,
स्टीलचे भांडे आणि ताट आपल्याला ही milel का,
अस नेहमी वाटायचे……
परंतु आज पंचतारांकित होटेल मधे सुद्धा,
जेव्हा छोट्या छोट्या मातीच्या भांड्यातुन जेवन दिले जाते,
तेव्हा वाटते,
शेवटी आपण तिथेच आहोत…….!
लहानपणी गावात सुती कपडे/मांजरपाट घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालताना दिसायचे, वाटायचं आपणही असे घालावे.
मोठेपणी जेव्हा टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले…
आनी मग सुती कपडे महाग झाले.
म्हनजे शेवटी आपण तिथेच आहोत…. !
शालेत khelatana पडलो तर पँट फाटायची, आई मग छानपैकी thigal लावुन शिवून दयायची ..
शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून आटापीटा असायचा,
मोठेपणी मात्र लोकांना फाटलेल्या जिन्स दुप्पट क़ीमत ने घेताना बघितले.
मग वाटते…. शेवटी आपण तिथेच आहोत…!!
लहान होतो तेव्हा ना दुध ना साखर,
घरी गुळाचा चहा मिळायचा …
वाटायचं आपणही इतरासारखे साखरेचा चहा प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत……
शेवटी आपण तिथेच आहोत….!
लहानपणी कधीतरी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं आपणही फिरावं,
आता सकाळी सकाळी सर्वाना दूचाकी सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटत..
शेवटी आपण तिथेच आहोत…..!
लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं बाजरी/नाचनी ची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी ,चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं..
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत ..
शेवटी आपण तिथेच आहोत…. ..!
लहानपणी फ़ुटक़या खापरी च्या, Chandramouli घरात राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं ,,
आज तीच बंगलेवाले मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट) मध्ये राहतात तेंव्हा वाटत ..
शेवटी आपण तिथेच आहोत.. ..!
आता कळतं….
जसं आहे तसच क़ायम रहाव……
कुणाचं पाहून बदलु नये,
जे आपल्याकडे आहे तेच आपल्या साठी योग्य आहे …..
………🙏🙏🙏……””आज ही आपण तिथंच आहोत””…