सध्या तरी मास्क/शारीरिक अंतर / हात धुणे/ इमारतीच्या अंतर्भागातली गर्दी टाळणे / व्यायाम/ १ मल्टीव्हिटॅमिन/व्हिटॅमिन सी २००० मिग्रॅ / व्हिटॅमिन डी १००० युनिट्स / ५० मिग्रॅ एलेमेंटल झिंक एव्हढे नक्कीच पाळावे!
सध्या व्यायाम सर्वात महत्वाचा .
१. व्यायामशाळा सध्या संसर्गाच्या शक्यतेमुळे टाळावी.
२. एरोबिक (चालणे / धावणे/टेकडी चढणे /सायकल चालविणे ) आणि स्नायूवर्धक (वजने/डंबेल्स, जोर-बैठका , सूर्यनमस्कार ) व्यायाम हे अल्टर्नेट दिवशी करावे. आठवड्यांतून किमान पाच दिवस व्यायाम करावा.
३. चालताना , धाप न लागता, जास्तीत जास्त जितक्या वेगाने चालता येईल तितके चालावे- त्याने टार्गेट हार्ट रेट मिळतो. चप्पल-बूट यांच्याकडून “कुशनिंग” मिळाले पाहिजे. (“नायकी” टाईपचे बूट वर्षभराने बदलावे- ते दिसतात चांगले, पण त्यांचे कुशनिंग संपलेले असते!).
४. चालताना शक्यतो वाहनांचा धूर नसेल अशा जागी जावे, कडक फूटपाथ टाळावा- मातीसारखा रस्ता चांगला.
५. किमान वीस मिनिटे आणि कमाल एक तास चालावे, एक तासाहून जास्ती चालल्यास इजा होऊ शकते. चालताना दोन्ही हातात एक ते तीन पौंडाची वजने घेतल्यास अधिक कॅलरीज जळतात .
६. व्यायामाचा कंटाळा सर्वानाच असतो. त्यावर उत्तम उपाय तीन: एक म्हणजे व्यायामाचे प्रकार बदलत राहणे, आणि दुसरा म्हणजे एक व्यायाम-सवंगडी ठेवणे- असे दोन लोक, एकमेकांना “लायनीवर” ठेवू शकतात. दिवसातली व्यायामाची वेळ फिक्स्ड ठेवावी, तसेच व्यायामाचे कपडे, बूट इत्यादि , चटकन मिळतील असे तयार ठेवावे.
उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!
डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...
Read more