I m always Inspired from this very energetic Poem
त्रासाने भरलेल्या खोक्यावर
मी “आनंद” असं लिहितो
…आणि दुःख confuse होतं
येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देतो
…आणि दुःख confuse होतं
खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जातो
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होतो
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात हात देतो
…आणि दुःख confuse होतं
संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
…आणि दुःख confuse होतं
किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जातो
…आणि दुःख confuse होतं
म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात
सांगा काय वाईट आहे?
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेतो
…आणि दुःख confuse होतं.
एक आवडलेली डाॅ अब्दुल कलाम साहेबांची कविता 🙏🏻