🤣😫😭😩😂😅🤣😫😩
आई – वडिलांच्या प्रेमाला
श्रीफळाचा मान
प्रसाद समजुन घ्यावे
ठेऊन त्यांचा मान .
बहीण -भावाच्या प्रेमाची
गंमतच न्यारी
एक आहे आंबा ,
तर एक आहे कैरी .
भावा -भावांच्या प्रेमाची
रीत थोडी वेगळी
जणु एकाच बागेतली
फणस नि पोफळी .
बहिणी -बहिणींच्या प्रेमाला
कशाचीच नाही तोड
एक आहे संत्री तर
एक मोसंबी गोड .
नवरा -बायकोच्या प्रेमाची
इमली खट्टी- मिठी ,
प्रेम आहे आत तरी
शब्द नाही ओठी .
नणंद – भावजयीचे प्रेम
आहे थोडे चटकदार ,
हळू -हळू मुरावा
जसा लोणच्यात खार
जावा -जावांच्या प्रेमाची
गोडीच भारी
जशा एकाच करंडीत
हापूस , केशर, पायरी .
सासु -सासऱ्यांच्या प्रेमाला
तिखट , आंबट, तुरट झाक ,
सगळं पचवायला
लागतोच ना आले पाक ..
मैत्रीच्या नात्यात
. नाही हेवा -दावा ,
चोखून- चाखून घ्यावा
ऊसाच्या रसाचा गोडवा .
नात्यांची चव
हळू हळू चाखावी,
आंबट – गोड फळांप्रमाणे
आयुष्याची लज्जत वाढावी.
🙏🙏🌹🌺🌸🌷🌻