म्हणून शांत राहणं चांगलं
शब्दाने शब्द वाढला की
वाढत जातो कलह,
नकळत नाती दुरावून
वाढत जातो मग विरह
म्हणून शांत राहणं चांगलं
नकळत ओठांतून शब्द
घायाळ करणारे सुटतात,
समोरच्याच्या मात्र थेट
काळजात ते घुसतात
म्हणून शांत राहणं चांगलं
शब्दांनी जुळतात परस्परांशी
प्रेमळ अशी नाती आणि,
शब्दांनीच ओली होतात
डोळ्यांचीही पाती
म्हणून शांत राहणं चांगलं
मन तोडण्यासाठी
शब्दांना असते धार,
त्या धारेने मग होतात
कधी न पुसणारे वार
म्हणून शांत राहणं चांगलं
बोलणारा आपले शब्द
सहजच विसरून जातो,
ऐकणारा ह्रदयाच्या कोपऱ्यात
त्यांच घर बांधून बसतो
म्हणून शांत राहणं चांगलं
आपले हजारो योग्य शब्द
दुर्लक्षित केले जातात,
पण एक अयोग्य शब्द
कोरून मात्र ठेवतात
म्हणून शांत राहणं चांगलं
म्हणून शांत राहणं चांगलं….