दिल्ली येथून गोव्याला जातांना विमानात एक सज्जन भेटले. सोबत त्यांच्या पत्नी ही होत्या. पुरुषाचे वय ऐंशी च्या जवळपास असेल. मी विचारले नाही परंतु त्यांची पत्नी ही पंचाहत्तर च्या पुढेच असावी. वयाचा प्रभाव सोडला तर दोघे जवळ जवळ फिट होते.
पत्नी खिड़की च्या बाजूला बसली होती. सज्जन मध्ये आणि कोपऱ्यावरच्या सीट वर मी होतो.
विमान हवेत उंचावल्यावर पत्नी ने काही खाण्याचे सामान काढले आणि पति ला दिले. पति कापऱ्या हातांनी हळूहळू खाऊ लागले.
मग विमानात जेवण देण्यास सुरुवात झाली तर त्यांनी राजमा-चावल ची ऑर्डर दिली.
दोघेही आरामात राजमा-चावल खात होते. कोल्ड ड्रिंक म्हणून त्या व्यक्तीने कुठलातरी ज्युस मागवला होता.
जेवण झाल्यावर जेव्हा त्यांनी ज्युस च्या बाटली चे झाकण उघडायला सुरुवात केली तर झाकण उघडतच नव्हते. ती व्यक्ती कापऱ्या हातांनी ते उघडायचा प्रयत्न करत होते.
मी लक्षपूर्वक त्यांचेकडे बघत होते. मला वाटले की त्यांना झाकण उघडणे अवघड होत होते, म्हणून मी शिष्टाचार म्हणुन म्हटलं की “द्या, मी उघडून देतो.”
त्या व्यक्तीने माझ्याकडे बघीतले व हसत म्हणाले, “बेटा, झाकण तर मलाच उघडावे लागेल.”
मी काही विचारले नाही, परंतु प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले.
हे बघून ते सज्जन पुढे म्हणाले, “बेटाजी, आज तर तुम्ही उघडून द्याल, परंतु पुढच्या वेळेस? कोन उघडेल? म्हणून मला स्वतःला उघडता आले पाहिजे.”
पत्नी ही पति कडेच बघत होती. ज्युस च्या बाटली चे झाकण त्यांच्याकडून अजूनही उघडले नव्हते, परंतु पति प्रयत्न करीत राहिले व खूपदा प्रयत्न केल्यावर त्यांना झाकण उघडण्यात यश आले. दोघेही आरामात ज्युस पीत होते.
मला दिल्ली ते गोवा च्या त्या उड्डाणात जीवनाचा एक धडा मिळाला.
त्या व्यक्ती ने मला सांगितले, त्यांनी असा नियम बनवला होता की, आपले काम ते स्वतः करतील.
घरात मुलं आहेत, मोठा परिवार आहे. सर्व एकत्रच रहातात. परंतु आपल्या दैनंदिन गरजांसाठी ते फक्त पत्नीचीच मदत घेतात, इतर कुणाचीही नाही. त्या दोघांना एकमेकांच्या गरजा माहीत आहेत.
ते मला म्हणाले की, “जितके शक्य असेल, स्वतःचे काम स्वतःच केले पाहिजे. एकदाचे काम करणे सोडून दिले व दूसऱ्यांवर अवलंबून राहिलो तर समजून जा बेटा, की अंथरुणावरच पडून रहावे लागेल.
मग मनात हमेशा हेच म्हणेल की, हे काम याच्याकडून करवून घेऊ, ते काम त्याच्याकडून. मग तर चालण्यासाठी ही दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागेल.
आता चालतांना पाय थरथरतात, जेवतांना ही हात थरथरतात. पण जोपर्यंत स्वावलंबी राहू शकू, राहिले पाहिजे.
आम्ही गोव्याला चाललो आहोत. दोन दिवस तेथेच राहू.
आम्ही महीन्यात एक दोन वेळा असेच फिरायला निघतो. मुलं- सुना म्हणतात की एकटे जाणे जिकीरीचे होईल. पण त्यांना कोनी समजावावे की, जिकीरीचे तर तेव्हा होईल, जेव्हा आम्ही चालणे-फिरणे बंद करून स्वतःला घरात बंद करून घेऊ.
संपूर्ण जीवनात खूप काम केले. आता सर्व मुलांवर सोपवून आमच्यासाठी महिन्याची रक्कम ठरवून घेतली आहे, आणि आम्ही दोघं त्या पैशावर आरामात फिरतो.
जेथे जायचे असते त्या स्थळाचे तिकीट एजंट बुक करुन देतो. घरी टॅक्सी घ्यायला येते. परत येतांना विमानतळावर ही टॅक्सी घ्यायला येते. हाॅटेलात काही त्रास होणार नसतो. वयानुसार तब्येत अगदी उत्तम आहे.
हां, कधी-कधी ज्युस च्या बाटलीचे झाकण उघडत नाही, पण थोडा जोर लावला तर ते ही उघडून जातेच.”
🤷♂मी तर आ वासून बघतच राहिलो.
मी ठरवले होते की या वेळेच्या उड्डाणात लॅपटॉप वर एक संपूर्ण चित्रपट बघेन. पण येथे तर मी जीवनाचा चित्रपटच बघत होतो. तो चित्रपट, ज्यात जीवन जगण्याचा संदेश लपलेला होता.
“जोपर्यंत शक्य असेल,
स्वावलंबी रहा.”
स्वतःचे काम शक्यतो
स्वतःच करा.”
आज की औरतें
आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...
Read more