✍🏼 प्रवास खूप छोटा आहे☝🏼🙏🏼
एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती.
पुढच्याच स्टॉपवर एक स्थूल आणि वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्या सोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली.
🚌
त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो त्या तरूणीला म्हणाला की “तू काहीच का बोलत नाहीस?”😴
तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला
👉🏼 “अनावश्यक किंवा बाष्फळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे.”
👉🏼ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे.
“इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, आपला प्रवास खूपच छोटा आहे” 👈🏼
🌸आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, हा तर काही मिनीटांचाच प्रवास आहे , तसेच जीवन हा सुद्धा एक काही काळापुरता प्रवासच आहे. मानवाचे आयुष्य मर्यादित आहे. आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.
🌸कोणी आपले मन दुखावलंय का?
शांत रहा, प्रवास खूप छोटा आहे.
🌸कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?
सोडून द्या, शांत रहा, कारण
प्रवास खूप छोटा आहे.
🌸कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.
आपला प्रवास खूप छोटा आहे.
🌸आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया.
जर मी तुम्हाला अनावधानाने कधी दुखावले असेल तर मला माफ करा. जर तुम्ही मला कधी दुखावले असेल तर मी ते कधीच सोडून दिले आहे.
कारण एकच की,
👉🏼 आपला प्रवास खूप छोटा आहे!.☝🏼
👉🏼इतिहासातील काही घटना नक्कीच बोधप्रद आहेत.त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे.
🌸🤺अर्धे जग जिंकलेला आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर राजा आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, ‘ मी मरेल तेंव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा, जगाला कळू द्या, जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर खाली हात गेला.👐🏽
🌸फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट वाटरलूच्या तुरुंगात खंगुन खंगुन मेला.
🌸जर्मनीचा शहेनशहा ज्याने दुसरे महायुद्ध घडवले त्या एडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली.
🌸इराकचा बादशहा सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली. नको तितकी संपत्ती गोळा केली. शेवटी फासावर लटकावे लागले.
🌸अमेरिकन सरकारला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन याला अमेरिकन सैन्याने सर्जिकल स्ट्राइकने उचलून ठार केले व त्याचे प्रेत समुद्रात टाकून दिले.
🌸आपल्या वडिलांना (शाहजहानला ) तुरुंगात टाकून, भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या, भारतावर साम्राज्य असलेल्या बादशहा औरंगजेबाच्या समाधी कडेही कोणी बघत ही नाही.
🌸एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुसोलिनीला झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले.
🌸फ्रांसची हुकूमत ताब्यात असलेल्या 16 व्या लुईला लोकांनी गिलोटिनवर चढवले.
🌸कार्ल मार्क्सला डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले.
🌸जगाला आपल्या अभिनयाने हसवणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला.
🌸भल्याभल्यांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मंरो ही अति मद्य सेवनाने मेली.
🌸मनोरंजनातून लोकांच्या मनावर राज्य करणारे राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, ए के हँगल, परवीन बाबी, माला सिन्हा यांचे मृत्यू आठवा.नुकतेच चित्रपट अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांनी नैराश्यातून स्वतःचे जीवन संपविले.
सध्याच्या कोरोना विषाणू मुळेतर जगावर मोठेच संकट आले आहे.
सांगायचे तात्पर्य हे कि आपले आयुष्य मर्यादित आहे. जन्मापासून तर म्रुत्यूपर्यंतचा जीवनप्रवास असतो काळ कुणासाठी थांबत नाही
आपल्या कडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल.
पण चांगल्या कर्माने मिळवलेली माणुसकीच साथ देईल.👏🏼
🌸 कितीही संपत्ती मिळविली असली तरी ती म्रुत्युनंतर इथेच रहाणार आहे 👉🏼 भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका. जोडलेला पैसा कपाटात रहातो , जोडलेली माणसे , नातेवाईक स्मशानापर्यंतच येतात ,सोबत काहीही येत नाही , पण चांगले कर्म , सत्किर्ती मात्र सोबत येत असते
🌸 शेवटी एकच सांगतो, आपला जीवनप्रवास खूप छोटा आहे. जीवन सुंदर आहे, ते आनंदाने जगा , परोपकारी जीवन जगा ,आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा.इतरांना जे सहकार्य करता येईल , जे शक्य असेल ती मदत करा,🤝🏼 दुसऱ्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.. प्रत्येकाला शेवटी तिथेच जायचे आहे… जिथे परत येण्याचा रस्ताच नाही…. 👉🏼 आपला प्रवास खूप छोटा आहे 👏🏼👏🏼👏🏼 😊
Always life is beautiful, be happy