मिडी गेली, साडी गेली,
फ्रॉक तर दिसेनासाच झाला.l
बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा
पंजाब होऊन गेला.ll
कुंकू गेलं, टिकली आली,
तीही न्हाणी घरात गेली
आणि अवघी न्हाणी
सुवाशीण झाली.ll
बाबा कधीच गेला,
बिचाऱ्या आईनं अंथरुन धरलं.l
काल जन्माला आलेलं मुल
मम्मी- पप्पा बोलू लागलं.ll
फेटा राहिला कार्यापुरता,
गांधी टोपीचे दिवस सरत आले.l
पंचविशीच्या पोरांचे.
केस फारच पिकू लागले.ll
गावात रंगलेला गप्पांचा पार,
कधीचाच ओस पडला.l
हिंडता फिरताना माणूस आतां.
एकटाच बोलू लागला.ll
यंत्र आणि तंत्रामुळे,
कष्ट फारच कमी झाले.l
धक्का-धक्की च्या जीवनात
मरण मात्र स्वस्त झाले.ll
कंप्युटर आणि इंटरनेटमुळे,
जग फारच जवळ आलं !!
माणसांच्या या अफाट गर्दीत
माणूसपण हरवून गेलं.ll
अहो, असा कसा हा,
फॅशनचा जमाना आला.
गृप मध्ये एवढी गर्दी असूनही.
माणूस एकटाच राहिला ll
🍁🍂🍁 🍂🍁🍂