🙏एकदा एका गुरूंनी त्यांच्या दोन शिष्यांना थोडे गहू दिले व सांगितले, ‘‘मी परत येईपर्यंत हे गहू नीट सांभाळा.’’ एका वर्षाने परत आल्यावर गुरु पहिल्या शिष्याकडे गेले व त्या म्हणाल्याला विचारले, ‘‘गहू नीट ठेवले आहेस ना ?’’ त्यावर त्या शिष्याने ‘‘हो’’ म्हणून गहू ठेवलेला डबा आणून दाखविला व म्हणाला, ‘‘आपण दिलेले गहू जसेच्या तसे आहेत.’’ त्यानंतर गुरूंनी दुसर्या शिष्याला गव्हाबद्दल विचारले. तो शिष्य गुरूंना जवळच्या शेतावर घेऊन गेला. गुरु पहातात तर सगळीकडे गव्हाच्या कणसांनी डवरलेले पीक दिसत होते. ते पाहून गुरूंना खूप आनंद झाला. असेच आपल्या गुरूंनी दिलेले नाम, ज्ञान आपण इतरांना देऊन वाढविले पाहिजे.🚩👣🌹👏
आजची सावित्री डॉ. सौ.रीना कैलास राठी
शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र ! नाशिक...
Read more