कोणी लिहिलंय माहीत नाही. पण पटलच म्हणून शेयर करतोय….
Do you know?
हे केमिकल कंपोजीशन?
गूळ+खोबरे = बुद्धीवर्धक (म्हणून बाप्पाचा नैवेद्य)
गूळ+शेंगदाणे = शक्तिवर्धक (म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)
तिळ+गुळ = केल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न + झिंक + सेलेनियम (हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,
यातले सेलेनियम – केन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत )
असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील…
आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जातात,
कारण हे जर शिकवले तर bornvita कोण पिणार?
आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लेन पीत न्हवते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? अहो एक आपला मावळा 50 शत्रूंशी एकटा लढायचा,
कुठले व्हे – प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?
शिवाय आपले पूर्वीचे पंडित एवढे हुशार होते, एक से एक होऊन गेले महान पंडित, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते का?
मुळात आपल्याला इतिहासच अश्या पद्धतीने शिकवला जातो की इंग्रज आले म्हणून आपण तारले गेलो, आपण खूप गरीब होतो, अंधश्रद्धा होती वगैरे, पण इंग्रज तेव्हा आले जेव्हा त्यांनी भारतातील प्रत्येकाच्या घरात सोने भरलेले पाहिले, जे आपण व्यापार करून कमवत होतो,
लोखंड, स्टील, कापड एक्स्पोर्ट करून आपण त्या वजनाचे सोने घायचो (करन्सी न्हवती), उगाच का पोर्तुगीज, मुगल, इंग्रज वर्षानुवर्षे आपल्यावर आक्रमक करत होते… जर भारत श्रीमंत नसता तर ही आक्रमणे झालीच नसती ना.. गरिबांच्या देशावर कशाला कोण वर्षानुवर्षे राज्य करेल… सोने भरभरून जहाजे गेली ब्रिटिशांकडे, जेव्हा आपल्याकडे हे सर्व होते तेव्हा ब्रिटन मध्ये भूकमारी होती… हे कधीच आपल्याला सांगितले जात नाही, हे जर सांगितले तर जातीवाद आपोआप संपेल ना…मग तोडा आणि राज्य करा हे होऊच शकणार नाही… इतिहासात जर चाणक्य यांचे धडे सुद्धा ऍड केले तर तेव्हांचा व्यापार त्यांनी सुरू करून भारताला कसा बुस्ट दिला? हे शिकायला मिळेल पण कोण रिस्क घेणार? लोकं एकत्र येतील ना मग…
तर, आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती… जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते, अहो वयाच्या 18-19 वर्षी वागभट्टांचे संपुर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहले राव तेव्हाच्या लोकांनी… कुठले टॉनिक पीत होते का ते? स्वतःला प्रश्न विचारा….
आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण प्युअर…
आपण हजारो वर्षांपासूनच सायन्स मध्ये ऍडव्हान्स होतो. आपल्याला या सर्वांची गरज नाही…
देशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा, आपले पूर्वज आपल्यापेक्षा खूपच हुशार आणि ऍडव्हान्स होते…