HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home COVID-19

कोविड टेस्ट

by whatsapp जनता
in COVID-19, Health
411 4
कोविड टेस्ट
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

कोविड टेस्ट

कोविड आजाराचा सध्या सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला किती वेळ लागतो ? HRCT व त्याचा score म्हणजे काय ? Rapid antigen test आणि RT–PCR यांच्यात फरक काय ? या सर्व गोष्टी आपण या चवथ्या कोरोणा लेखात पाहणार आहोत.

कोरोनाच्या मुख्यत: २ प्रकारच्या तपासण्या असतात
1) Viral Test
2) Antibody Test

RelatedPosts

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ

स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!

कोरोनाचे निदान होण्यासाठी Antibody Test चा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही.

कोरोना निदानासाठी Viral Test चाच मुख्यतः वापर होतो. त्याशिवाय रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास HRCT चा निदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता समजण्यासाठी उपयोग होतो.

Viral Test या मुख्यत्वेकरुन ३ प्रकारच्या असतात.

  1. Rapid Antigen test
  2. RT–PCR
  3. True Nat Test

तपासण्यांचा खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च

1) Rapid Antigen test — 450 रु
2) RT–PCR– 2500 रु
3) True Nat Test — 1200 रु
4) HRCT — 6000 — 8000 रु

तपासण्यांसाठी लागणारा वेळ

1) Rapid Antigen test — अर्धा तास
2) RT–PCR– 24 ते 48 तास
3) True Nat Test — अर्धा तास
4) HRCT — अर्धा ते एक तास

कोणती तपासणी कधी करावी

यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

Antigen Test

a.) ज्या रुग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यामध्ये

RT–PCR

a.) ज्यांची Antigen Test ही निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट.
b.) कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या contact मधील लोक.
c.) परदेशातून येणारे लोक.

True Nat Test

a.) Brought Dead व्यक्ती
b.) बाळंतपणासाठी आलेल्या माता
c.) Emergency Operation चे रुग्ण

( जर True Nat चाचणी उपलब्ध नसेल तर Antigen Test करावी. )

महाराष्ट्र शासनाने HRCT ला कोविडच्या निदानासाठी परवानगी दिलेली नाही. ही तपासणी कोविड निदानासाठी शासनातर्फे ग्राह्य मानली जात नाही.

आता सर्व तपासण्यांची विस्तारीत माहिती पाहुयात.

Rapid Antigen Test

१) यामध्ये विषाणूंच्या surface spike मधील antigen protein तपासले जाते.

२) यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो.

३) या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो.

४) ही तपासणी RT–PCR तपासणी पेक्षा स्वस्त व लवकर होणारी आहे.

५) या तपासणी साठी प्रशिक्षित व्यक्तीची ( Well Trainer ) ची गरज लागत नाही.

६) तपासणी तील दोष
a. कोरोना सदृशच लक्षणे असणाऱ्या फ्लू सारख्या आजारात या तपासणीची sensitivity ही केवळ ३४ ते ८० टक्के असते.
याच तर्काने अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते.

b. बऱ्याच Asymptomatic ( लक्षणे नसलेल्या ) पेशंट मध्ये नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते
कारण या तपासणीत antigen चे amplification केले जात नाही.

७) मग ही तपासणी का केली जाते ??
a.) ज्यावेळी viral load जादा असतो त्यावेळी ही तपासणी highly sensitive असते. त्यामुळे बाधित पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.

b.) ही तपासणी RT–PCR पेक्षा स्वस्थ व पटकन होणारी आहे.

c.) सर्व पेशंटची RT–PCR तपासणी करणे शक्य नसते अशावेळी RT–PCR चाचण्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी.

d.) समुह संसर्ग ( Community spread ) होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण ( Isolation ) करणे व त्याअनुषंगाने रोगाचा प्रसार टाळण्यासाठी.

e.) Antigen test निगेटिव्ह येवूनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर RT–PCR तपासणी केली जाते.

f.) Antigen मशिन हे Treu Nat मशिनच्या तुलनेत स्वस्त असते व या मशिनवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य असते.

RT–PCR

Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction

१) यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या RNA पासूनही हजार पटीने DNA तयार केले जातात जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात ( जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही ).

२) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वात खात्रीशीर व अचूक तपासणी आहे.

३) पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो.

४) यासाठी नाकातून व घशातून swab घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जावू शकते.

५) या तपासणीसाठी योग्य प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागते.
जी इतर दोन तपासण्या करिता इतकी गरजेची नसते.

६) कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो त्यानंतर तो फुफ्फुसांत वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतूसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधी साठी पॉझिटिव्ह येतो. नंतर Throat swab हा False Negative येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतूसंसर्गाच्या दुसऱ्या आठवड्यात श्वासनलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते.

बरेच असे video बघण्यात आले की आपण RT–PCR चा रिपोर्ट ज्यावेळी मागून घेतो त्यावेळी त्यातील CT value ( Cyclic Threshold ) ही विचारुन घ्या. ती जर २४ पेक्षा जादा असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा कमी असतो म्हणजेच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संक्रमण ही कमी प्रमाणात होते व जर CT value ही २४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा जादा असतो म्हणजेच हे लोक इतरांमध्ये जादा संक्रमण पसरवतात.

हे जरी खरे असले तरी बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेकदा viral load जादा असूनही त्यांच्यामध्ये लक्षणे ही अल्प किंवा मध्यम स्वरुपात बघायला मिळतात. जसे की लहान मुले ज्यांच्यामध्ये क्वचितच लक्षणे तीव्र स्वरुपाची असतात पण त्यांच्याद्वारे जंतूसंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवला जातो.

याउलट वयस्कर लोकांमध्ये viral load कमी असूनही तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसतात.

हा खरं तर विरोधाभास आहे.

व त्याचे कारण हे आहे की कोविड मध्ये होणारी complications ही केवळ शरीरात जाणाऱ्या विषाणू मुळे होत नसतात. तर ती प्रामुख्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने ( Immune system ने ) त्या virus ला किती व कशा प्रकारे प्रतिसाद दिला व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या Inflammatory changes मुळे होत असतात. Immune system च्या प्रतिक्रिया व त्यामुळे होणाऱ्या Inflammatory changes या प्रत्येक पेशंट नुसार वेगवेगळ्या असतात. व त्यामुळे कोणाकोणामध्ये काहीच लक्षणे दिसत नाहीत तर कोणामध्ये खूपच Complications निर्माण होवू शकतात.

CT value ही प्रामुख्याने viral load किती आहे ते सांगते. कोविड किती घातक ठरु शकतो हे नाही. त्यामुळे ICMR ने RT–PCR च्या रिपोर्ट मध्ये CT value देण्यास परवानगी दिलेली नाही.

TrueNAT test

१) हे मशिन गोव्यातील Malbio Diagnostic या कंपनीद्वारे बनवले आहे.

२) हे मशिन पूर्वी TB ची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलिकडेच ICMR ने COVID 19 टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.

३) हे मशिन छोट्या आकाराचे असून ब्रिफकेस मधून कोठेही घेवून जाता येवू शकते.

४) हे मशिन बॅटरीवर चालते एकदा बॅटरी चार्ज केली की १० तासांपर्यंत चालू शकते.

५) या मशिन मध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. मशिन जर ४ स्लॉटचे असेल तर जास्तीत जास्त ४ टेस्ट एका वेळी करता येवू शकतात. ८ तासाच्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त ४५ टेस्ट होवू शकतात.

६) दुर्गम भागात जिथे मोठ्या लॅबची संख्या कमी आहे व जेथून स्वॅब घेवून RT–PCR साठी मोठ्या लॅबमध्ये पाठवणे हेदेखील मुश्किल असते अशा ठिकाणी प्रामुख्याने हे मशिन वापरले जाते.

७) या तपासणी मध्येही RT–PCR प्रमाणे विषाणूचा Genome हा Amplify केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.

८) या तपासणीत मुख्यत: कोरोना विषाणूचा E Gene व विषाणूच्या RNA मध्ये असणारे RdRp हे Enzyme शोधले जाते.

९) ही तपासणी RT–PCR पेक्षा बऱ्याच जलद होते ( अर्धा ते एक तासात ) तसेच या तपासणीसाठी लागणारा खर्चही कमी असतो. (१२०० ते १३०० रुपये) तसेच ही तपासणी करायला सोपी आहे व त्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागत नाही.

१०) असे असले तरी या मशिनची किंमत जादा असल्याने (६.५ ते १२ लाख ) व पुरवठा कमी असल्याने हे मशिन अजून सगळीकडे उपलब्ध नाही आहे.

Antibody Test

१) शरीरात एखादा Antigen ( बाहेरचा कोणताही सजीव घटक जसे bacteria, virus इत्यादी ) गेल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी जे घटक शरीरामार्फत तयार केले जातात त्यांना Antibody म्हणतात.

२) Antibody Test ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते.

३) Infection झाल्यानंतर शरीरात Antibodies तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.

४) सर्वच लोकांना कोविडमध्ये लक्षणे निर्माण होतील असे नाही. अशावेळी किती लोकांना हा आजार होवून गेला हे लक्षात येण्यासाठी व त्यावरुन या आजाराचा मृत्यूदर निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने या तपासणीचा उपयोग होतो.

HRCT

१) ही चाचणी म्हणजे छातीचा CT scan असतो.

२) ही चाचणी कोविड निदानासाठी शासनातर्फे जरी ग्राह्य धरली जात नाही.

३) तरीही लक्षणे सुरु होवून ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.

४) RT–PCR च्या तुलनेत याचा रिपोर्ट लगेच मिळत असल्याने तसेच न्युमोनियाची तीव्रता लक्षात येत असल्याने याचा कोविड उपचारासाठी चांगला उपयोग होतो.

५) RT–PCR प्रमाणे याचा रिपोर्ट ही अधिक खात्रीशीर व अचूक असतो. तसेच यावरुन पेशंटच्या शरीरात सुधारणा होवू शकते की पेशंटची स्थिती आणखी बिघडू शकते याचेही याचेही अचूक निदान करता येते.

६) लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या ४ दिवसांत HRCT हा इतकी sensitive नसते त्यामुळे ५०% कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये HRCT चा रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता असते. पण त्यानंतर HRCT ही Highly sensitive म्हणजेच एकदम अचूक असते.

७) HRCT च्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात

a.) सुरवातीला ( कोविड लक्षणे सुरु झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये ) — Ground Glass Opacity (GGO)

b.) ७ दिवसानंतर न्युमोनिया वाढल्यास —

  1. GGO वाढणे
  2. Crazy paving pattern
  3. Consolidation
  4. Fibrosis

८) HRCT Score

a.) न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.

b.) हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो.

c.) 25 पैकी स्कोर असताना

1) कमी प्रमाणातील न्यूमोनिया — 12 पेक्षा कमी स्कोर असणे.

2) मध्यम न्यूमोनिया — 12 ते 18 स्कोर असणे.

3) तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया — 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.

d.) फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.

e.) बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.

९) पेशंटची न्यूमोनिया आणखी वाढू शकतो की कमी होवू शकतो हे कळण्यासाठी HRCT सोबतच C Reactive Protein,
serum ferritin, lymphocytes या तपासण्या करणेही गरजेचे असते.

१०) X रे मध्ये कोविड ची सुरवातीची GGO सारखी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे X रे चा कोविड निदानासाठी हवा तितका उपयोग होत नाही.

कोविड टाईम लाईन

कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात हे आता पाहू.

दिवस ० — जंतूसंसर्ग

दिवस ५ — लक्षणे दिसण्यास सुरुवात

दिवस १ ते २८ — RNA व Antigen पॉझिटिव्ह

दिवस २८ — RNA व Antigen निगेटिव्ह

दिवस ० ते ७ — फक्त RT–PCR टेस्ट पॉझिटिव्ह

दिवस ९ — HRCT मध्ये लक्षणे दिसतात

दिवस ७ — IgM Antibody पॉझिटिव्ह

दिवस १४ — IgG Antibody पॉझिटिव्ह

दिवस २१ — IgM Antibody निगेटिव्ह

दिवस १४ ते २१ — रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो.

दिवस २१ ते २८ — RT–PCR
कधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.

Tags: CoronaCovid-19

Related Posts

Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

by whatsapp जनता
March 18, 2025
0

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...

Read more
वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ
Health

वैद्यकीय क्षेत्रावरील बांडगूळ

by whatsapp जनता
February 29, 2024
0

आजार म्हणजे काहीतरी कारणाने शरीराच्या नियमित कार्य पद्धतीत बदल करणारी स्थिती. यात वेगवेगळी लक्षणं शरीरात निर्माण होतात. या आजार निर्माण करणाऱ्या कारणांना...

Read more
स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!
Health

स्वतःच तपासा स्वतःची मानसिक अवस्था!

by whatsapp जनता
February 29, 2024
0

NCD फार्मूला (Acu. Hr. अनिल जाधव यांच्या आरोग्यविषयक whatsapp groups साठी साभार संकलित.) सर्वांना आदरपूर्वक नमस्कार! या पोस्ट सोबत जी इमेज दिलेली...

Read more
कोविड टेस्ट
COVID-19

प्रिय मित्रा कोविड-१९

by whatsapp जनता
September 29, 2020
0

प्रिय मित्रा कोविड-१९, तुला येऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. पहिल्यापासून तू नीट आठवलंस, तर मी तुला कधीही शत्रू म्हटलेलं नाही. तुझ्याशी...

Read more
उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला..
Health

टायफाॅईड मेरी…

by whatsapp जनता
September 29, 2020
0

डॉ.प्रज्ञावंत देवळेकर यांची ही पोस्ट 'सफर विज्ञानविश्वाची' ग्रुपवरून... ____________ पालिकेचे फोन ‘ब्लाॅक’ करत ‘होम क्वारंटिन’चा शिक्का पुसून ‘कोविड’ पेशंट सर्रास फिरतायेत अश्या...

Read more
विलक्षण खोबरेल तेल
Health

विलक्षण खोबरेल तेल

by whatsapp जनता
September 29, 2020
0

आपल ते सोनं पण ओळखणार कोण? 👉 खोबरेल तेल खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे! माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

9 months ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

9 months ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

9 months ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

2 years ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

2 years ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.