Whatsapp University

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

↪ Forwarded many times 1 min read

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

तो पटकन xxx कडे बघून म्हणाला “या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका”.

खरं तर xxx लाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी त्याला विचारले, “मग काय म्हणतात याला?”.

“स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व
स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा म्हणतात”.

मराठी शब्दकोषात दोन शब्द कळाले.

मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती
झाली.

पाण्याचा … माठ
अंत्यसंस्काराला…मडकं
नवरात्रात … घट
वाजविण्यासाठी…घटम्
संक्रांतीला… सुगडं
दहिहंडीला… हंडी
दही लावायला… गाडगं
लक्ष्मीपूजनाचे… बोळकं
लग्न विधीत… अविघ्न कलश
आणि
अक्षय्य तृतीयेला…केळी व करा

खरंच आपली मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच.

मंगल प्रसंगी हातात धरतात त्याला करा म्हणतात
हे माहिती होते पण अक्षय तृतीयेला केळी व करा
म्हणतात माहिती नव्हतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top