HOT
Whatsapp University
No Result
View All Result
Whatsapp University
No Result
View All Result
Home Motivational

शिक्षक !

by whatsapp जनता
in Motivational, Story, मराठी
457 5
भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणस..!!!
Share on FacebookShare on WhatsappShare on Twitter

🔥कर्तव्य🔥
बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली.
“अरे ही चप्पल शिवायची आहे”
समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.
“तुम्ही जोशी सर ना?”
त्याने विचारलं.
“हो.तू?”
“मी गजानन.गजानन लोखंडे.झेड.पी.च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे.”
“बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये” जोशी सर त्याला निरखत म्हणाले.
“असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन”
“पण तू हा व्यवसाय का…..?”
“सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय.”
“काय झालं वडिलांना?
“सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात”
“ओह!आणि तुझे भाऊ?”
“दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत.शिकताहेत.आई अशिक्षित.”
“अच्छा” ज़ोशी सर विचारात गढून गेले.गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.
काही दिवसांनी ते परत आले.गजूला म्हणाले “अरे माझ्या मापाचा एक बुट तयार करुन देशील?”
गजू तयार झाला.त्याने माप घेऊन दोन दिवसात तयार बुट करुन दिला.सरांना तो आवडला.त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले.गजूला खुप आनंद झाला.इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.

आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले.सगळे जोशी सरांनी पाठवलंय असं सांगायचे.
काही दिवसांनी सर आले.गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला.त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले “गजू तुझ्या हातात कला आहे.तू असं का करत नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबुट ठेवले तर गिर्हाईकांना थांबावं लागणार नाही”
” सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील.तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ”
“हरकत नाही.मी देतो तुला.पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे.चालेल?”
गजू तयार झाला.आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहीली.महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला.जोशी सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले.त्यांनी ते त्याला परत केले.
“मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती.सहा महिन्यानंतरच मला परत कर.तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर.”

RelatedPosts

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

रुस मधील विवाह

गजूचा आता उत्साह वाढला.त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली.उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली.आता त्याला वेळ पुरेनासा झाला.
सहा महिन्यांनी सर आले.गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.
“सर खुप चांगलं चाललंय.पण आता पुढं काय करायचं”
“गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं.तिथे हे सगळं शिफ्ट करायचं.मी पाहून ठेवलंय दुकान.अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे.आणि हो!स्माँल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो.एम.आय.डी.सी.मध्ये फँक्टरी टाकून दे”
“काय?फँक्टरी?”गजू थरारला”सर मला जमेल का?”
“सगळं जमेल.मी आहे ना”सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.
“सर खुप करताय माझ्यासाठी”
“अरे ते माझं कर्तव्यच आहे”त्याला उठवत ते म्हणाले”माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत.कोणी इथे मोठे अधिकारी आहेत.तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?”गजूच्या डोळ्यात पाणी आलं.

दोन वर्षात गजू खुप पुढे गेला.फँक्टरी वाढली.एकाची तीन दुकानं झाली.गजूचा गजानन शेठ झाला.झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के.फ्लँटमध्ये रहायला गेला.भाऊबहीणी चांगल्या शाळाकाँलेजमध्ये जाऊ लागले.दरम्यान त्याचे वडील वारले.वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं.मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता.काही दिवसांनी त्याची आई वारली.
इकडे जोशी सरांना निव्रुत्त होऊन पाच वर्षे झाली होती.सर आता थंकले होते.त्यांच्या मुलाने इंग्लंड मध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती.त्यामुळे सर दुःखी होते.त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.

एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला.सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला.सरांची मुलगा,मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत.ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला.पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.
सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला.सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं ते गजूला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता.

एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला.त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.
” सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत.आज मला अजून एक मदत कराल.?”
” अरे आता तुला मदतीची काय गरज?तू आता खुप मोठा झालाय.बरं ठिक आहे सांग तुला काय मदत हवी आहे?”
“सर माझे वडील व्हाल?”
सर स्तब्ध झाले.मग म्हणाले”अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय”
“तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या.मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय.तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे”गजू हात जोडत म्हणाला.
“अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?”
“सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय.तिलाही वडील नाहीयेत.तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत.शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की!”
“बघ बुवा.म्हातारपण फार वाईट असतं.मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.
“मुलगा म्हंटलं की ते सगळं करणं आलंच.सर तो सारासार विचार करुनच मी आलोय”
सर विचारात पडले.मग म्हणाले “ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे.मला तू सर म्हणायचं नाही”
“मी माझ्या वडीलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेन”
सर मोकळेपणाने हसले.
“अजून एक अट.तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे.त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची”
😥गजूला गहिवरुन आलं .त्यानं सरांना मिठी मारली.दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते.

🔥सत्य घटनेवर आधारीत…🔥
संकलीत.
शिक्षक हा असा असतो.

Related Posts

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

by whatsapp जनता
May 8, 2025
0

१९९० पूर्वी…लग्नामध्ये आहेर/ भेटवस्तु केल्यानंतर माईकवरून सांगण्याची पद्धत होती.अमुक अमुक व्यक्ती कडून एक रुपया, तमूक तमूक कडून दोन रुपये, अशा प्रकारे!ज्याची भेट...

Read more
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

by whatsapp जनता
May 8, 2025
0

कुंभाराला म्हणाले "मडकं दे". तो पटकन xxx कडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका". खरं तर xxx लाही माहित नव्हतं...

Read more
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

by whatsapp जनता
May 8, 2025
0

💐सुधा नारायण मूर्ती आपला अनुभव सांगताना लिहितात :💐 "नुकतीच मी रशिया मधील माॅस्को येथे गेले होते. तेथे एक दिवस मी बागेत गेले....

Read more
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

by whatsapp जनता
March 18, 2025
0

डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...

Read more
आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!
Devotional

आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!

by whatsapp जनता
March 1, 2024
0

औदुंबर नाव उच्चारताच दत्तगुरु आठवतात आणि दत्त गुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते, तिथे हा सोहळा कसा साजरा होतो बघा. आज औदुंबर...

Read more
भगवंताचं ATM
Life

आजची सावित्री डॉ. सौ.रीना कैलास राठी

by whatsapp जनता
February 29, 2024
0

शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र ! नाशिक...

Read more
Load More

Trending

१२०० रागांचा अफाट खजिना
History

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

1 month ago
म्हणून शांत राहणं चांगलं
Life

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

1 month ago
कोरोनाकालीन लग्न
Life

रुस मधील विवाह

1 month ago
हक्काचं ठिकाण..
Life

आज की औरतें

1 year ago
Adult

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!

1 year ago
Whatsapp University

WhatsApp-University...??

sigh!!!

This site is only of Fwd Msgs which we receives on whatsapp. People are very keen on fwding the content. This portal is just a godown of such fwds.

Follow Us

Recent News

१२०० रागांचा अफाट खजिना

१९९० पूर्वीचे मराठी लग्न

May 8, 2025
म्हणून शांत राहणं चांगलं

कुंभाराला म्हणाले “मडकं दे”.

May 8, 2025

Tags

Animals article change Corona Covid-19 Cricket devotional fitness Food Friends Friendship good read Happines happy Health healthy food History humour india inspiration Jokes Life Lifestyle Maharashtra Marathi Memories mental health motivation Motivational music Old Days People philosophy Poem positivity Pscology pune puneri rich Science spiritual think thought thoughtful TV
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

No Result
View All Result
  • Animals
  • Articles
  • Bollywood
  • Celebs
  • COVID-19
  • Devotional
  • DIY
  • Food
  • Health
  • History
  • Humour
  • Jokes
  • Life
  • Memes
  • Money
  • Motivational
  • Music
  • News
  • People
  • philosophy
  • Poem
  • Politcs
  • Puzzle
  • Recipes
  • Rituals
  • Science
  • Spiritual
  • Sport
  • Cricket
  • Story
  • Tech
  • Uncategorized
  • Video
  • Yoga

© 2020 Whatsapp University, Website By Maarich

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.